AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी, गारपिटीने सर्वाधिक नुकसान विदर्भाचे, भरपाईच्या अनुशंगाने प्रशासनाचे काय आहे नियोजन?

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील तब्बल 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामासह फळबागा आणि खरीपातील अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचाही समावेश आहे. आता कुठे अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाली होती. लागलीच कृषी विभागाकडून पीक पाहणीला सुरवात झाली आहे.

अवकाळी, गारपिटीने सर्वाधिक नुकसान विदर्भाचे, भरपाईच्या अनुशंगाने प्रशासनाचे काय आहे नियोजन?
संग्रहीच छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 2:29 PM
Share

नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Untimely rains) अवकाळी आणि  (Hailstorms) गारपिटीमुळे विदर्भातील तब्बल 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी हंगामासह फळबागा आणि खरीपातील अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचाही समावेश आहे. आता कुठे अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाली होती. लागलीच (agriculture department) कृषी विभागाकडून पीक पाहणीला सुरवात झाली आहे. कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले असून या विभागातील 50 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीच्या स्वरुपात तरी पदरी काय पडते का असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये झाले सर्वेक्षण

गेल्या वर्षभरापासून शेतकरी एक ना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. यापूर्वी अतिवृष्टी आणि त्यानंतर 15 दिवासाला अवकाळी पाऊस यामुळे शेती व्यवसाय करावाच कसा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. पेरणी, बी-बियाणे, मशागत या सर्व बाबींवर खर्च करुन अखेर उत्पादनच मिळत नाही. शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता अवकाळी आणि गारपिट होताच अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला हे त्यामधील सर्वाधिक प्रभावित जिल्हे होते. शासनाने या जिल्ह्यांमधील नुकसानीची दखल घेत सर्वेक्षणाअंती प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे.

रब्बी पिकांसह फळबागाचे नुकसान

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांनी फळबागा फवारण्याठी हजारो रुपये खर्ची केले होते. शिवाय पोषक वातावरणामुळे रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचा पेरा केला होता. मात्र, अवकाळी आणि गारपिटीमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे 49 हजार 435 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.

या प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष मदत

प्रशासनाच्या सुचने प्रमाणे कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडे सादर केला आहे. त्यानुसार नुकसानीचे क्षेत्र पाहून आता पंचनामे करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभागाला देण्यात येतील. त्यानुसार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीक नुकसानीचे पंचनामे केले जातील. शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केला असल्यास पंचनामे दरम्यान विमा कंपनीचेही प्रतिनिधी असणार आहेत. आता केवळ प्राथमिक अहवालाचे सादरीकरण झाले असून वरिष्ठांच्या सूचनांनुसारच प्रक्रिया होणार असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Positive News | चार कृषी विद्यापीठांच्या 193 शिफारशींना मान्यता, यांत्रिकिकरणावर विद्यापीठांचाही भर

KCC : महिन्याभरात 50 हजार पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत

थंडीचे अनेक फायदे, अवकाळीचा मात्र धोकाच, कसा होतो पिकांवर परिणाम? वाचा सविस्तर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.