एसटीची धडक बसली, दुचाकीचा बॅलन्स गेला! मागे बसलेली आई एसटीच्या चाकाखाली आली आणि जागीच….

Pune Accident News : सध्या चिंचवडे नगर इथं राहणारी आणि मूळची आर्वी येथील असलेली 58 वर्षीय महिला शारदा निवृत्ती भोर आपल्या मुलासह बाईकवरुन चालली होती. त्यावेळी एसटी बसच्या चाकाखाली आल्याने महिला जागीच ठार झाली. पण, मुलगा अगदी थोडक्यात बचावला.

एसटीची धडक बसली, दुचाकीचा बॅलन्स गेला! मागे बसलेली आई एसटीच्या चाकाखाली आली आणि जागीच....
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 12:42 PM

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंब इथं भीषण अपघात (Kalamb Accident) झाला. एसटी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आणि आई एकत्र दुचाकीवर जात होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातातून मुलगा अगदी थोडक्यात बचावला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठा वाहतूक कोंडी झाली होती. शारदा निवृत्ती भोर (Sharada Nivrutti Bhor) असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.

आणि एसटीचं चाक डोक्यावर गेलं!

पुणे नाशिक महामार्गावरील कळंब गावच्या हद्दीत वर्पेमळ इथं रविवारी सकाळी हा अपघात घडला. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सध्या चिंचवडे नगर इथं राहणारी आणि मूळची आर्वी येथील असलेली 58 वर्षीय महिला शारदा निवृत्ती भोर आपल्या मुलासह बाईकवरुन चालली होती. त्यावेळी एसटी बसच्या चाकाखाली आल्याने महिला जागीच ठार झाली. पण, मुलगा अगदी थोडक्यात बचावला. आईच्या जागीच झालेल्या मृत्यूने मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर भोर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय.

मयूर निवृत्ती भोर हे आपल्या आईला घेऊन गावी निघाले होते. मामा प्रभाकर दत्तात्रय वाईकर यांच्याकडे हिवरे इथं जात असतेवेळी त्यांच्या आईवर काळाने घाला घातला. मंचर पोलिसांनी या अपघाताबाबत अधिक माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका कसा घडला अपघात?

मयूर भोर हे मामाच्या घरी हिरवे इथं आईसोबत जायला निघाले होते. त्या दरम्यान, पुणे-नारायण गाव ही एसटीही जात होती. पुणे नाशिक महामार्गावरुन जात असताना कळंब गावच्या हद्दीत त्यांच्या बाईकच्या हॅन्डलला या एसटी बसने धडक दिली. एसटी उजव्या बाजूने भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी एसटीचा धक्का बसल्यानं दुचाकीवरील तोल गेला आणि दुचाकीवर मागे बसलेल्या शारदा निवृत्ती भोर या एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या. डोक्यावर एसटीचं चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंचर पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास केला जातो आहे. या अपघातामुळे राज्यातील रस्ते अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचं अधोरेखित झालंय. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत या संपूर्ण अपघाताचा तपास केला आणि वाहतूक पूर्ववत करण्यास प्रयत्न केले.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.