AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : रग्णवाहिका आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक, दोघा तरुणांचा जागीच मृत्यू

Pune Rajguru nagar accident News : ॲम्बुलन्स नाशिकहून बाजूने पुण्याच्या दिशेने चालली होती. समोरून आलेल्या दुचाकीची रुग्णवाहीकेला चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसली. पण त्यात काही फूट अंतर दुचाकी ओढत गेली.

Pune Accident : रग्णवाहिका आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक, दोघा तरुणांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 04, 2022 | 10:22 AM
Share

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात (Pune Accident news) झाला. या अपघातात दोघा तरुणांचा जीव गेला आहे. रुग्णवाहिका आणि बाईक यांच्या जोरदार धडक झाली. समोरसमोरच झालेल्या भीषण धडकेत दोघा तरुणाचा जागच्या (2 young boys died in Bike ambulance Accident) जागी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर (Rajguru Nagar Accident) जवळ हा भीषण अपघात झाला. गेल्या 24 तासांत झालेल्या दोन अपघातामध्ये चार तरुणांनी जीव गमावला आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातातही दोघा बाईकस्वार तरुणांचा मृ्त्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुणे-नाशिक हायवेवरही भीषण अपघातात आता आणखी दोघा तरुणांनी जीव गमावलाय.

समोरासमोर जोरदार धडक

राजगुरुनगर शहरादवळ पुणे-नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृहाजवळ हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांचं वय अवघं 23 वर्ष होतं. आतिश नंदकिशोर सोमवंशी आणि मयूर अशोक पवळे अशी अपघातातील मृत तरुणांची नावं आहेत. आतिश आणि मयूर हे दोघेही दुचाकीवर होते. त्यावेळी दुचाकी आणि रुग्णवाहिकेची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत जबर जखमी झालेल्या दोघा तरुणांचा जागीच जीव गेला.

रुग्णवाहिकेने फरफटत नेलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲम्बुलन्स नाशिकहून बाजूने पुण्याच्या दिशेने चालली होती. समोरून आलेल्या दुचाकीची रुग्णवाहीकेला चालकाच्या बाजूने जोरदार धडक बसली. पण त्यात काही फूट अंतर दुचाकी ओढत गेली. यामध्ये दुचाकीवर असलेल्या दोन युवकांचा रस्त्यावर पडून गंभीररित्या जखम झाली. जबर मार बसल्याने दोन्हीही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झालाय.

या अपघातानंतर खुद्द रुग्णवाहिकेचे चालक महेश चंद्रकांत बालकोळी यांनी खेड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघाताची संपूर्ण चौकशी केली. सध्या या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

पुणे-नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढतेय. मानवी चुकांमुळे व वाहतुकीचे नियम न पाळल्याने बहुतांश अपघात होत असल्याचं दिसून येतंय. वाढत्या अपघातात कोवळ्या वयातच तरुणांना जीव गमवावा लागत असल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. तर पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगरचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघात वाढले असल्याचंही बोललं जातंय.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.