लेकीला भेटायला आलेल्या तडिपार गुंडाची पुण्यात हत्या, मुख्य आरोपीसह दोघे काही तासात जेरबंद

राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेला असताना तडिपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याची पाबळ रोडवर निर्घृण हत्या करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

लेकीला भेटायला आलेल्या तडिपार गुंडाची पुण्यात हत्या, मुख्य आरोपीसह दोघे काही तासात जेरबंद
(डावीकडे) आरोपींना अटक, (उजवीकडे) गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:11 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात झालेल्या कुख्यात गुंडाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाच्या खून प्रकरणी मुख्य आरोपीसह दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रविवारी लेकीला भेटायला आला असताना गोळीबार करुन, आणि नंतर डोक्यात दगड टाकून आरोपींनी राहुलला संपवलं होतं.

एकाच दिवशी दोन गुंडांच्या हत्या

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन कुख्यात गुंडांच्या हत्या झाल्यामुळे रविवारी पुणे हादरलं होतं. खेड-राजगुरु नगरमध्ये राहुल उर्फ पप्पू वाडेकर या तडीपार गुंडाची हत्या करण्यात आली होती. गोळीबारानंतर डोक्यात दगड टाकून राहुलला संपवण्यात आलं होतं, तर त्याच दिवशी म्हणजेच रविवारी दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाची तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली होती.

पप्पू वाडेकर हत्ये प्रकरणी दोघे गजाआड

यापैकी राजगुरुनगर शहरालगत झालेल्या पप्पू वाडेकरच्या खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही तीन आरोपी फरार आहेत.

कशी झाली होती हत्या?

राजगुरुनगर शहरात लेकीच्या भेटीला आलेला असताना तडिपार गुंड राहुल उर्फ पप्पू वाडेकर याची पाबळ रोडवर निर्घृण हत्या करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास राहुलवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

Pune Goon Rahul Pappu Wadekar Murder Accuse Arrest 2

आरोपींना अटक

तडिपारीचा आदेश झुगारुन प्रवेश

पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा अंदाज खेड पोलिसांनी आधीच वर्तवला होता. राहुल उर्फ पप्पू वाडेकर याला चार महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तडिपारीचा आदेश झुगारत त्याने खेड राजगुरुनगर शहरात प्रवेश केला, त्यावेळी त्याची हत्या झाली. या प्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत मुख्य आरोपी मिलिंद जगदाळेसह पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुंड अक्षय किरतकिर्वेचीही हत्या

दुसरीकडे, पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकिर्वे या गुंडाचीही रविवारी हत्या करण्यात आली होती. चौघा जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी अक्षयवर कोयत्याने सपासप वार केले होते. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला होता.

गुंड अक्षय किरतकिर्वे याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याचीही पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकामागून एक झालेल्या दोन गुंडांच्या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.

23 सराईत गुन्हेगार तडीपार

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या भोसरी, पिंपरी, निगडी, भोसरी एमआयडीसी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. 23 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार करण्यात आले. या 23 गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2020-21 या वर्षामध्ये 98 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या हत्या, एकावर गोळीबार, दुसऱ्यावर कोयत्याने वार

VIDEO: भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं

(Pune Goon Rahul Pappu Wadekar Murder Two arrested including Main accuse)

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.