AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात पुन्हा विजेचा खेळखंडोबा! भोसरी, आकुर्डीमधील तब्बल 60 हजार ग्राहकांना फटका

पिंपरीतील प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.

पुण्यात पुन्हा विजेचा खेळखंडोबा! भोसरी, आकुर्डीमधील तब्बल 60 हजार ग्राहकांना फटका
फोटो संग्रहित.Image Credit source: TV9
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 23, 2022 | 2:04 PM
Share

पुणे – पुण्यात आज (23 मार्च) पुन्हा विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळालाय. महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे भोसरी, आकुर्डीमधील(Akurdi) 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद (Power off) झाला. महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे भोसरी व आकुर्डीमधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांसह सुमारे साठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील(Power transformer) बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असले तरी अद्यापही बिघाड दुरुस्त झालेला नाही. दरम्यान, सध्या पर्यायी किंवा इतर तांत्रिक उपाययोजनेतून वीजपुरवठा कमीत कमी कालावधीसाठी बंद राहील यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेच्या वाढत्या मागणीमुळे भार व्यवस्थापनात अडचणी येत आहे. त्यामुळे भोसरी विभागातील इतर ग्राहकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा अशी विनंती करण्यात येत आहे.

महावितराणाने सांगितले की

भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन व 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील100 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील 100  एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.

या भागातील वीज गायब

पिंपरीतील प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे.

दुरुस्तीचे काम सुरूच

महापारेषणकडून बिघाड झालेल्या 100एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या 220  केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील 16 वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या 10  वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरण यांच्याकडून करण्यात आले आहे.

Kokan Farmer : आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा ‘वाली’ कोण? ना नुकसानीचे पंचनामे ना कोणती मदत?

भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या घरी BMC अधिकारी दाखल

tv9 Special: धूण्या भांड्याचं पाणी ‘रियूज’ करणार, मोदी सरकारकडून प्रोजेक्टचा शुभारंभ, तुमचं पाणी परत तुमच्याकडेच !

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक