AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Electriciy Failure : पुणे, पिंपरीसह राज्यात सातत्याने बत्ती गुल, कारणं आणि उपाय काय?

पुणे शरहासह जिल्ह्यात, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बुधवारी सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत (Power outage) झाल्यानं लोकांचे हाल झाले. अशा घटना अधून मधून पुणे, पिंपरीसह राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत.

Pune Electriciy Failure : पुणे, पिंपरीसह राज्यात सातत्याने बत्ती गुल, कारणं आणि उपाय काय?
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 11, 2022 | 4:44 PM
Share

पुणे : शरहासह जिल्ह्यात, पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बुधवारी सकाळपासूनच वीज पुरवठा खंडीत (Power outage) झाल्यानं लोकांचे हाल झाले. अशा घटना अधून मधून पुणे, पिंपरीसह राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. इतर राज्यांमध्येही अशा घटना घडत असतात. यामागे काय कारणं असतील, आणि त्यावर काय उपाय करावे लागतील? याबाबत मुंबई ऊर्जा मार्गाचे प्रकल्प संचालक निनाद पितळे म्हणाले, अशा प्रकारे सातत्याने वीज पुरवठा खंडित (Electriciy Failure) होतोय, यावरुन राज्यातल्या विद्युत पायाभूत सुविधेवर किती ताण आहे हे दिसून येते. यातून बाहेर पडण्यासाठी वीज पुरवठा पायाभूत सुविधा विकसित व प्रबळ करण्यामध्ये संबंधित गुंतवणुकांची आवश्यकता असेल.

महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही (400 KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये बुधवारी 5 ठिकाणी ट्रिपिंग (Triping) झालं होतं. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं. या ट्रिपिंगमुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. पिंपरीत तर पाणी पुरवठ्यावरही (Water Supply) परिणाम जाणवला असून आता नेमकी वीज येणार कधी? असा प्रश्ना पुणे आणि पिंपरीतील लोकांना पडलाय.

निनाद पितळे म्हणाले, “पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये वीज पुरवठा खंडित होणे यामधून राज्यातील विद्युत पायाभूत सुविधेवर निर्माण होत असलेला तणाव दिसून येतो. काही वर्षांपूर्वी मुंबईने या गोष्टीचा सामना केला आहे. महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीकोनासाठी राज्याच्या वीज पुरवठा पायाभूत सुविधा विकसित व प्रबळ करण्यामध्ये संबंधित गुंतवणुकांची आवश्यकता असेल ज्यामुळे वाढत्या वीज मागणीची पूर्तता करता येईल. सध्याच्या पारेषण नेटवर्कवर या बाबीचा प्रचंड दबाव आहे. त्यांनी क्षमतेपलिकडे काम केले आहे. राज्यात सुलभपणे वीज पुरवठा होण्यास मदत करेल अशी प्रबळ पारेषण यंत्रणा निर्माण करणे काळाजी गरज आहे.”

इतर बातम्या

Pune | पुणे महापालिकेने सोमय्या यांच्या सत्काराला परवानगी नाकारली; मात्र सत्कार करणारच भाजपची आक्रमक भूमिका

Pune market yard | रत्नागिरी हापूस पुण्यातील मार्केट यार्डात दाखल ; एका पेटी आंब्याची लागली इतकी विक्रमी बोली रक्कम

किरीट सोमय्यांना सीआयएसएफचं संरक्षण, त्यांनी प्रोटेक्ट करायला हवं होतं : जयंत पाटील

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?