AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune no electrity | पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात बत्ती गुल होण्याचं कारण काय? उत्तर इथं मिळेल!

No electricity in Pune & Pimpari Chinchwad : सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.

Pune no electrity | पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात बत्ती गुल होण्याचं कारण काय? उत्तर इथं मिळेल!
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 9:02 AM
Share

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये (No Eletricity in Pune & Pimpari Chinchwad) सकाळपासूनच लोकांचे वीज पुरवठा खंडीत झाल्यानं हाल झालेत. महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही (400 KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी ट्रिपिंग (Triping) झालाय. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं. या ट्रिपिंगमुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. पिंपरीत तर पाणी पुरवठ्यावरही (Water Supply) परिणाम जाणवणार असून आता नेमकी वीज येणार कधी? असा प्रश्ना पुणे आणि पिंपरीतील लोकांना पडलाय.

ट्रिपिंगचं कारण धुकं आणि दव

पुणे आणि पिंपरीत पारा घसरला आहे. ढंडीचा कडाका वाढलाय. अशात अतिशय दाट धुके आणि दवं यामुळे या टॉवर लाईन मध्ये बिघाड झाल्याची शक्यता असल्याचं महापारेषणकडून सांगण्यात आलय. तसेच महत्वाचे दोन 400 केव्ही अतिउच्च दाब उपकेंद्र बंद असल्याने पर्यायी वीज पुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ शकली नसल्याचंही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान महावितरणकडून याबाबतची माहिती वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही देण्यात येत असल्याचं सांगितलंय.

काम सुरु, लाईट कधी येणार?

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. दरम्यान, या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावं असे आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आले आहे. तसंच पाणीही जपून वापरण्याचं आवाहन केलं जातंय. सकाळी 6 वाजल्यापासून वीज नसल्यामुळे विजेवर अवलंबून असणारी सर्व कामं ठप्प झाली आहे. त्याचा फटका अनेकांना बसला असून लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

संबंधित बातम्या :

Breaking News: पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातली लाईट गायब, पाणी पुरवठाही विस्कळीत

VIDEO | सारं सुरळीत असताना नियती वाईट वागली, विजू मानेंनी काळजाला हात घातला, कविता ऐकतानाच एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर

Video | ‘काँग्रेसचं काळं कुत्र जरी आलं तर झोडून काढू’, अनिल बोंडेंची Audio Clip व्हायरल!

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.