पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं यश, तीन कार जप्त; तिन्ही वाहनांचा वापर कशासाठी?

पुणे पोर्शे कार दुर्घटने प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील तीन जणांना अटक केली आहे. नातू, मुलगा आणि आजोबा या सर्वांना तुरुंगात टाकलं आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या तिन्ही कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं यश, तीन कार जप्त; तिन्ही वाहनांचा वापर कशासाठी?
pune police Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 9:22 PM

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या तिन्ही कार अखेर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कार या प्रकरणातील मोठा पुरावा आहेत. या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या कारमध्ये काही पुरावा मिळतोय का? याचीही तपासणी पोलीस करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. एका वॉर्ड बॉयलाही निलंबित करण्यात आलं आहे. तसेच ससूनच्या डीनला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत तीन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या कारने अपघात करण्यात आला, ती पोर्शे कार पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणानंतर विशाल अग्रवाल हा फरार झाला होता. तो छत्रपती संभाजी नगरला गेला होता. छत्रपती संभाजीनगरला जाताना त्याने किया गाडी वापरली होती. ही गाडीही जप्त करण्यात आली आहे. तसेच ड्राव्हरच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली मर्सिडिज कारही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांसाठी ही तिन्ही वाहने मोठा पुरावा असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मोबाईल जप्त

ड्रायव्हर गंगारामचा अग्रवाल पितापुत्रांनी काढून घेतलेला मोबाइल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. विशाल अग्रवाल याच्या घरातून मोबाईल जप्त करण्यात आला. अग्रवालने ड्रायव्हरला घरात कोंडून ठेवलं होतं. तेव्हा मोबाईल जप्त केला होता. पोलिसांनी आज अग्रवाल याच्या घरात सर्च ऑपरेशन केल्यानंतर हा मोबाईल जप्त केला आहे.

दोघे निलंबित, एक सक्तीच्या रजेवर

दरम्यान, पुण्यातील ब्लड सँपल प्रकरणी अखेर डॉ. विजय तावरे, डॉ. श्रीहरि हरनोर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने निलंबित केलं आहे. तसेच या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. त्यानंतर बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यता आलं आहे. त्यांच्या जागी बारामतीच्या अहिल्या देवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.

माणुसकीला काळीमा फासला

या प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आधीच सांगितलं होतं हे प्रकरणं अतिशय गंभीर आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. या पुढे कुठल्याही सरकारी दवाखान्यात डॉक्टर अशा प्रकारचे कृत्य करणार नाहीत, अशी कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत. अधिष्ठात्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. अपघात प्रकरण आणि त्यानंतर जे काही घडलं ते सर्व माणुसकीला काळींमा फासणारं आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

यापेक्षा अधिक काय करू शकतो?

ब्लड सँपल बदलणं ही दुर्देवी घटना आहे ही मी त्यावेळीच सांगितलं होतं. लोकं आपल्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून मी निर्देश दिले आहेत. पोलीस कारवाई करत आहेत. यापेक्षा आणखी काय करू शकतो आपण? असा सवालही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.