AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche Accident : पुणे अल्पवयीन मुलास वाचवण्यासाठी सिस्टीम केली क्रॅक, जाणून घ्या दहा मुद्दे

Pune Porsche Accident : बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने गुन्हा केला. बारावीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी १९ मे रोजी तो पबमध्ये गेला. भरपूर दारु घेतली. मग रात्री दोन वाजता विना क्रमांकाची पोर्श कार ताशी २०० किमी वेगाने चालवत दोन जणांना उडवले. त्यानंतर खरा खेळ सुरु झाला.

Pune Porsche Accident : पुणे अल्पवयीन मुलास वाचवण्यासाठी सिस्टीम केली क्रॅक, जाणून घ्या दहा मुद्दे
pune accident
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 3:02 PM

पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलाने केलेले “हिट अँड रन” प्रकरण संवेदनशील बनले आहे. या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलास वाचवण्यासाठी संपूर्ण शासकीय प्रणाली क्रॅक करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस, डॉक्टर…सर्वांना मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने गुन्हा केला. बारावीच्या निकालाचा आनंद साजरा करण्यासाठी १९ मे रोजी तो पबमध्ये गेला. भरपूर दारु घेतली. मग रात्री दोन वाजता विना क्रमांकाची पोर्श कार ताशी २०० किमी वेगाने चालवत दोन जणांना उडवले. त्यानंतर खरा खेळ सुरु झाला. अपघातग्रस्तांना न्याय मिळण्याऐवजी अपराध्याला वाचवण्यासाठी पूर्ण सिस्टीम कामाला लागली. जाणून घ्या दहा महत्वाचे मुद्दे…

  • स्पॉटवर दोन अधिकारी माहिती दिली नाही

अपघातानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, एपीआय विश्वनाथ तोडकरी घटनास्थळी पोहचले. परंतु त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही. दोघांचे निलंबन करण्यात आले.

  • कस्टडीत पिज्जा-बर्गर खाऊ घालण्याचा आरोप?

पोलीस कोठडीत अल्पवयीन मुलास पिज्जा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप आहे. परंतु पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप फेटाळून लावला. त्या मुलास कोणतीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही.

हे सुद्धा वाचा
  • आमदाराकडून दबावाचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे आरोपीच्या बचावासाठी मध्यरात्री पोलीस ठाण्यात आल्याचा आरोप झाला. परंतु आमदार टिंगरे यांनी पोलिसांवर दाबाव आणल्याचा आरोप फेटाळून लावला. पोलिसांनी सर्व कारवाई नियामानुसार झाल्याचे म्हटले आहे.

  • मुलाचे ब्लड सॅम्पल गायब

मुलास ब्लड सॅम्पलासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेले. त्या ठिकाणी दारु न घेतलेल्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल देण्यात आले. या प्रकरणात दोन डॉक्टरांना आता अटक झाली आहे. डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांना पोलिसांनी अटक केली.

  • बाल न्याय मंडळाची अनोखी शिक्षा

आरोपी अल्पवयीन होता. यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलास 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. फक्त 14 तासांत त्याला जामीन मिळाला. सुटकेनंतर 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश दिले. या अनोख्या शिक्षेवर चौफेर टीका झाली. त्यानंतर शिक्षा रद्द करत त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले.

  • अल्पवयीन मुलाने कार चालवलीच नाही

अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलाने नाही तर ड्रायव्हर कार चालवत असल्याचा दावा करण्यात आला. कबुली जबाब देण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणला गेला. त्याला बंगला देण्याचे लालच दिले. त्यानंतर त्याला धमकवले. तसेच दोन दिवस डांबून ठेवले.

  • तीन पिढ्यांना अटक

अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि अजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक झाली. सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हला दोन दिवस डांबून ठेवल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार

आरोपीच्या घरी असणाऱ्या सीसीटीवी फुटेजमधील डीवीआरमधून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. अग्रवाल कुटुंबियातील विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल हे अनेक गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती समोर आली.

  • कारचे रजिस्ट्रेशन नाही, परवाना नाही

पोर्श कारला नंबर नव्हता. विना रजिस्ट्रेशने गाडी शहरात फिरत होती. तसेच अल्पवयीन मुलाकडे लायसन्स नव्हते. त्यानंतर २०० किमी वेगाने तो गाडी चालवत होता.

  • बारमध्ये वारंवार दारु घेतली

अल्पवयीन मुलाने बारमध्ये वारंवार दारु घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाने 14 बार लायसन्स निलंबित केले आहे. पबचा मालक, मॅनेजरला अटक केली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरासह नऊ जणांना अटक केली आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.