AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Cyber Crime | हॉटेलला रेटींग देण्याचे काम…टास्क पूर्ण करताच पैसे…पुढे असे घडले

Pune Cyber Crime | पुणे शहरात सायबर फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सायबर ठग विविध आमिष देऊन लोकांची फसवणूक करत आहेत. आता पुणे शहरातील एका महिलेसंदर्भात धक्कादायक प्रकार घडला. अखेर या प्रकरणी पोलिसांनी...

Pune Cyber Crime | हॉटेलला रेटींग देण्याचे काम...टास्क पूर्ण करताच पैसे...पुढे असे घडले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 17, 2023 | 10:25 AM
Share

पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. परंतु काळजी घेतली नाही तर मोठा फटका बसू शकतो. सध्या सायबर भामेट विविध माध्यमातून फसवणूक करण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात गुन्हे वाढत असताना अटक झालेल्यांची संख्या मात्र नगण्य आहे. कधी ‘वर्क फ्रॉम होम’ देत असल्याचे आमिष देत फसवणूक होते, केव्हा पार्ट टाईम जॉबच्या नावावर फसवले जाते. यामुळे आयटी सिटी असलेल्या पुणे शहरातही सायबर फसवणुकीत मोठी वाढ झाली आहे. आता पुणे येथील एका महिलेची सायबर ठगांनी लाखो रुपयांत फसवणूक केली आहे. अखेर तिने या प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले प्रकरण

पुणे येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला ऑनलाइन पार्ट टाईम जॉबची ऑफर देण्यात आली. हे काम फक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटचे ऑनलाइन रेट करण्याचे होते. त्यासाठी तिला चांगला मोबदला देण्याचे आमिष देण्यात आले. सुरुवातील तिला काही पैसेही देण्यात आले. त्यानंतर अधिक पैसे कमवण्याचे लालच देऊन गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सुमारे 13 लाखांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली.

कसा केला संपर्क

पुणे येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात तिने म्हटले आहे की, 18 जुलै रोजी सायबर ठगांनी तिला संपर्क केली. तिला हॉटेल आणि रेस्टॉरंटचे ऑनलाइन रेटींग करण्याची ऑफर दिली. त्यासाठी प्रत्येक रेटिंगसाठी 150 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला काही पैसे देत विश्वास मिळवला. 13 ऑक्टोबरपर्यंत ही महिला त्यांनी दिलेली काम करत होती. अधिक पैसे मिळवण्यासाठी त्यांच्याकडे गुंतवणूक केली. एकूण 13 लाख रुपयांत तिची फसवणूक झाली.

पैसे काढण्यास नकार अन्

महिलेच्या खात्यावर पैसे दाखवले जात होते. परंतु जेव्हा तिने गुंतवलेले आणि कमवलेले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला नकार देण्यात आले. सध्या पैसे काढू नका, अधिक गुंतवणूक करा, असे सांगितले. परंतु तिने गुंतवणूक करण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्याशी त्यांनी संपर्क बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.