AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एर्टिगा कार 40 फूट दरीत कोसळली, चालकासह एक प्रवाशी जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेसवरून पुण्याहून मुंबईकडे ही एर्टिगा कार चालली होती. कार खालापूर हद्दीत बोरघाटात आली असता एक्सप्रेस वे वरील अफकोन कंपनीच्या पुढे वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सरळ दरीत कोसळली.

Raigad Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एर्टिगा कार 40 फूट दरीत कोसळली, चालकासह एक प्रवाशी जखमी
चंद्रपूरमध्ये शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 5:21 PM
Share

खालापूर : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दुपारी एर्टिगा कार (Ertiga Car) मुंबईकडे जात असताना बोरघाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार 40 फूट दरीत कोसळल्याची घटना आज घडली. या अपघाता (Accident)त कारमधील चालक आणि एक प्रवासी जखमी (Injured) झाला आहे. अफकोन कंपनीच्या पुढे कार आली असता ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रेस्क्यू करुन तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. बोरघात पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेसवरून पुण्याहून मुंबईकडे ही एर्टिगा कार चालली होती. कार खालापूर हद्दीत बोरघाटात आली असता एक्सप्रेस वे वरील अफकोन कंपनीच्या पुढे वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सरळ दरीत कोसळली. यात कार चालक व एक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना तात्काळ लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या टीमने एर्टिगा कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले.

सिन्नर येथे दुधाने भरलेला टँकर पलटी

सिन्नरच्या दापुर दोडी रस्त्यावर दुधाचा टॅंकर पलटी होऊन हजारो लिटर दूध रस्त्यावर सांडून दहा लाखांहून अधिक रक्कमेचे नुकसान झाले. पुण्याच्या मंचर येथून दापुर येथील डेअरीला दूध घेऊन जाणारा टॅंकर दापुर दोडी खुर्द रस्त्यावर भोजपूर फाट्याजवळ अज्ञात मोटारसायकलने हुलकावणी दिली. तसेच पावसाच्या रिमझिममुळे वळणावर अचानक ब्रेक दाबल्यामुळे टॅंकर पलटी होऊन रस्त्यावर आडवा झाला. यामध्ये दहा हजार पाचशे लीटर दूध रस्त्यावर वाया गेले तर टॅंकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (The Ertiga car crashed into a 40 foot valley on the Mumbai Pune Expressway)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.