VIDEO : बिस्किटचा पुडा द्या, दुकानदार महिलेकडे मागणी, पुडा घेण्यापूर्वीच मंगळसूत्र ओढून चोरटे पसार

अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवलीमधील शिवलिंग नगर परिसरात आशा कराळे यांचं दुकान आहे. या दुकानात त्या टेलरिंगच्या कामासह किराणा मालाची विक्री करतात. गुरुवारी दुपारी आशा या त्यांच्या दुकानात काम करत असताना लाल रंगाच्या स्कूटरवरून दोन सोनसाखळी चोर या परिसरात आले.

VIDEO : बिस्किटचा पुडा द्या, दुकानदार महिलेकडे मागणी, पुडा घेण्यापूर्वीच मंगळसूत्र ओढून चोरटे पसार
Ambarnath thief
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 8:38 AM

ठाणे : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका दुकानदार महिलेचं मंगळसूत्र खेचून पोबारा केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात हा प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याच्या अगदी समोरच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचं घर आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवलीमधील शिवलिंग नगर परिसरात आशा कराळे यांचं दुकान आहे. या दुकानात त्या टेलरिंगच्या कामासह किराणा मालाची विक्री करतात. गुरुवारी दुपारी आशा या त्यांच्या दुकानात काम करत असताना लाल रंगाच्या स्कूटरवरून दोन सोनसाखळी चोर या परिसरात आले. सुरुवातीला त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर आशा यांना हेरून त्यांच्या दुकानात जात बिस्किटाचा पुडा मागितला. यावेळी एक चोरटा आशा यांच्या दुकानात बिस्किटाचा पुडा घेण्यासाठी गेला, तर दुसरा चोरटा गाडी चालू करून आशा यांच्या दुकानाबाहेर थांबून राहिला. यावेळी आशा या दुकानाच्या काउंटरमधून बिस्किटांचा पुडा काढून देण्यासाठी खाली वाकल्या असता चोरट्यानं त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचं मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या घटनेनंतर आशा यांनी आरडाओरडा करत रस्त्यावर धाव घेतली.

शिवसेना शहरप्रमुखाचं घर 

धक्कादायक बाब म्हणजे आशा यांच्या दुकानाच्या अगदी समोरच शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचं घर आहे. त्यामुळे आशा यांचा गोंधळ ऐकून अरविंद वाळेकर यांच्या सुरक्षारक्षकांनीही बाहेर धाव घेतली. मात्र तोवर हे चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर यापूर्वी शिवसेना शहरशाखेत जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे त्यांच्याभोवती सतत सुरक्षरक्षकांचा गराडा असतो. तर त्यांच्या घरालाही २४ तास सुरक्षारक्षकांचा वेढा असतो.

वाळेकरांभोवती सुरक्षेचं कडं

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अरविंद वाळेकर यांची सुरक्षा हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. मात्र त्यांच्या घराबाहेर येऊन सोनसाखळीचोरांनी मंगळसूत्र ओढून नेल्यामुळे या संपूर्ण परिसराची सुरक्षितता धोक्यात आल्याचं बोललं जातंय. पूर्वी या परिसरामध्ये नाकाबंदी, पेट्रोलिंग या गोष्टी नियमितपणे सुरू होत्या. मात्र आता पोलीस साधी चक्करही मारत नसल्याचा या परिसरातल्या नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आणि गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जातेय.

या सगळ्याबाबत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारलं असता, सोनसाखळी चोरी आणि परिसराची सुरक्षा या गोष्टींचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच आमची गस्त ही वेळोवेळी सुरूच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अंबरनाथ शहरातल्या एका अतिशय गजबजलेल्या भागातून दुकानदार महिलेचे मंगळसूत्र चोरी करणं आणि तेही शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे राहात असलेल्या अतिशय संवेदनशील भागातून चोरी करून नेणं, हे अंबरनाथ पश्चिम पोलिसांना मोठं आव्हान समजलं जातंय. त्यामुळं भविष्यात या परिसराची सुरक्षा व्यवस्था चोखपणे सांभाळली जाते का? हे पाहावं लागणार आहे.

VIDEO अंबरनाथमध्ये दुकानदार महिलेचे मंगळसूत्र ओढलं!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.