AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवीला घ्यायचा होता घटस्फोट, पण त्याआधीच…वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं? मृत्यूचं धक्कादायक सत्य!

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीला शशांकपासून घटस्फोट घ्यायचा होता, असे एका व्हायरल क्लिपच्या माध्यमातून समोर आले आहे.

वैष्णवीला घ्यायचा होता घटस्फोट, पण त्याआधीच...वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं? मृत्यूचं धक्कादायक सत्य!
vaishnavi hagawane death case
| Updated on: May 21, 2025 | 6:07 PM
Share

Vaishnavi Hagawane Suicide Case : राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या सूनेचे नाव वैष्णवी हगवणे असे असून मुळशी येथे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, आमच्या वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. असे असतानाच आता वैष्णवीच्या काही कथिती ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लिप्समध्ये ती तिच्या सासरी होत असलेल्या जाचाबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच मला घटस्फोट घ्यायचा आहे, असंही तिनं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय.

शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे हिने 16 मे 2025 रोजी आत्महत्या केली होती. पण वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला. विशेष म्हणजे वैष्णवीच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातही तिच्या शरीरावर जखमा आणि वृण असल्याचं समोर आलं आहे. या जखमांमुळेही तिचा मृत्यू झालेला असू शकतो, असं या शवविच्छेदनात म्हणण्यात आलंय.

तिला घ्यायचा होता घटस्फोट, पण…

हे आत्महत्या प्ररकरण समोर आल्यानंतर वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ती तिच्यावर होत असलेल्या अत्याचारावर बोलत आहे. विशेष म्हणजे तिने यात तिचा नवरा शशांक याचंही नाव घेतलंय. सोबतच सासू आणि साररे यांच्या स्वभावाचं मला काही वाटत नाही. कारण सासू सासरे तसेच असतात. पण शशांकही माझा होऊ शकला नाही. माझा नवरा माझा न झाल्याचं मला सर्वांत मोठं दु:ख आहे, असं वैष्णवी हगवणे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे.

…तर ती वाचली असती

या व्हायरल ऑडिओ क्लिपनुसार वैष्णवी हगवणे ही तिच्या सासराच्या मंडळींच्या जाचाला कंटाळली असल्याचे समोर आले आहे. मी या सर्वाला कंटाळले आहे. मला घटस्फोट घ्यायचा आहे, याबाबत मी माझ्या वडिलांनाही सांगितलं आहे, असंही ती या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे. याच ऑडिओ क्लिपचा आधार घेऊन तिला शशांकपासून विभक्त व्हायचं होतं, पण त्याआधीच ती या जगातून निघून गेली आहे. घटस्फोट झाला असता तर कदाचित ती वाचली असती असंही बोललं जात आहे.

(टीप- टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?