AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात वाल्मिक कराडने घेतले महिलेच्या नावावर दोन ऑफिसेस? कोण आहे ती महिला? काय आहे कनेक्शन?

valmik karad: पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मिक कराड याने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक ज्योती जाधव या महिलेच्या नावाने केली आहे.

पुण्यात वाल्मिक कराडने घेतले महिलेच्या नावावर दोन ऑफिसेस? कोण आहे ती महिला? काय आहे कनेक्शन?
valmik karad
| Updated on: Jan 14, 2025 | 4:47 PM
Share

valmik karad: पुण्यातील प्राइम लोकेशन असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका इमारतीच काम सुरु आहे. या इमारतीत संतोष देशमुख प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड याने ऑफिस घेतल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होता. आमदार धस यांनी पैठणच्या सभेत केलेल्या या दाव्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याने ही गुंतवणूक एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. आता ही महिला कोण? ती महिला आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, न्यायालयाने आज वाल्मिक कराड याला मकोका लावला आहे.

कोण आहे ज्योती जाधव?

वाल्मिक कराड याचे पुण्यात फ्लॅट आहेत. पोलिसांना पुण्यात तो शरण आला. यामुळे वाल्मिक कराड आणि त्याच्या पुणे कनेक्शनची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. मात्र आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या इमारतीची कागदपत्रे समोर आली आहेत. यानुसार वाल्मिक कराड याने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने दोन ऑफिसेस खरेदी केली आहेत.

पुण्यातील इमारतीत काय काय आहे ?

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मिक कराड याने गुंतवणूक केली. ही गुंतवणूक ज्योती जाधव या महिलेच्या नावाने केली आहे. या प्रकल्पात ऑफिस नंबर ६१० सी हे अपार्टमेंट आहे. त्यात ४५. ७१ चौ. मी कार्पेट एरियाचे ऑफिस आहे. त्यात बाल्कनी आणि खाली पार्किंगला पण जागा देण्यात आली आहे.

दुसरे ऑफिस नंबर ६११ बी या ऑफिसचा कारपेट एरिया हा ५४.५१ चौसर मिटर आहे. त्यालाही बाल्कनी आणि खाली पार्किंगला जागा देण्यात आली आहे. हा व्यवहार २५ कोटींना झाल्याची माहिती आहे. मात्र ज्योती जाधव या महिलेचा वाल्मिक कराड याच्याशी संबंध काय ? हा प्रश्न आहे. आता या प्रकरणात ईडीकडूनही तपास होण्याची शक्यता आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.