AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : सियाने केतनला बनवलेलं ATM मशीन, लग्नाआधी किती कोटी उकळले, मोठी माहिती अखेर समोर

Ketan Agarwal Murder Case : सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, पण त्याचे पैसे मात्र तिहा हवे होते. सियाने केतनकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती समोर येत आहे... एवढंच नाही तर, तिने इतकी मोठी रक्कम केतनकडून का घेतली? याबद्दल देखील मोठा खुलासा झालेला आहे.

Ketan Agarwal Murder Case : सियाने केतनला बनवलेलं ATM मशीन, लग्नाआधी किती कोटी उकळले, मोठी माहिती अखेर समोर
| Updated on: Jun 29, 2026 | 10:57 AM
Share

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. ज्या थक्क करणाऱ्या आहेत. आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, सियाने केतनला लग्नाआधीच एटीएम मशीन बनवलं होतं. सियाने केतन कडून तब्बल 1 कोटी रुपये उकळले होते. सियाला केतन याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. पण तिने साखरपुड्यानंतर पैसे घेतल्याची माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, सियाला तीन वर्षांनंतर बॉयफ्रेंड चेतन याच्यासोबत लग्न करायचं होतं. अशात योजनेनुसार, सियाने शॉपिंगचं कारण सांगत केतन याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपये घेतले आणि थेट चेतन याला दिले. चेतन या पैशांच्या जोरावर स्वतःचं करियर आणि व्यवसाय उभारणार होता. चेतन याने सियाला विश्वासात घेतलं आणि सांगितलं, पैसे मिळाल्यानंतर स्वतःच्या पायांवर उभा राहील, त्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतील… सिया आणि चेतन यांची योजन अशी होती की, केतन याच्या मृत्यूनंतर चेतन स्वतः सियाच्या कुटुंबियांना भेटणार होता आणि लग्नासाठी सियाच्या आई – वडिलांना विचारणार होता.

सिया गोयल हिने पोलिसांना काय सांगितलं

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान सियाने सांगितल्यानुसार, सिया हिला केतन याच्यासोबत लग्न कधीच करायचं नव्हतं. केतनच्या निधनानंतर सिया हिला पुन्हा लग्न करण्यासाठी जवळपास दोन ते तीन वर्षांचा कालावधी आणखी मिळाला असता. तपासातून हे देखील समोर आलं की, लग्न रद्द केल्यास आपली बदनामी होईल, अशी भीती सिया आणि चेतन या दोघांनाही वाटत होती.

लोहगडावर नेमकं काय झालं?

दरम्यान, लोहगड किल्ल्यावर 26 वर्षीय केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी एक नवीन खुलासा केला आहे. केतनच्या हत्येसाठी एका विशिष्ट ‘सिग्नल’वर आधारित योजना आखण्यात आली होती, असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. सियाने बॉयफ्रेंड चेतनला अशी सूचना दिली होती की, ती खाली बसताच त्याने केतनला धक्का द्यावा. ठरलेल्या योजनेनुसार, सिया जमिनीवर बसली तो क्षण चेतनसाठी ‘सिग्नल’ ठरला; त्याने मागून येऊन केतन अग्रवालला कड्यावरून खाली ढकलून दिलं.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया दूर बसली होती, कारण धक्का लागल्यानंतर केतनने तिला पकडलं असतं.. तपासात असं देखील समोर आलं आहे की, 31 मे रोजी देखील सियाने केतनला लोहगडावरुन ढकलण्याचा प्रयत्न केलेला. पण झाडांना पकडून त्याने स्वतःचे प्राण वाचवले. त्याच वेळी सियाने साप दिसल्याचे निमित्त केलं.

आरोपींची पोलीस कोठडी

केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार आहे. केतन हत्याकांडामधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ती आज संपणार आहे. आज दुपारच्या सत्रात मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात ह्या दोघांना हजर करणार आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट