AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होते ‘नको ते धंदे’ , पोलिसांनी केला पर्दाफाश, दोघींची सुटका

स्पा सेंटर उघडून त्याच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचडवड येथे पोलिसांनी कारवाई करून या उद्योगाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

Pune Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होते  'नको ते धंदे' , पोलिसांनी केला पर्दाफाश, दोघींची सुटका
| Updated on: Dec 26, 2023 | 12:06 PM
Share

पिंपरी | 26 डिसेंबर 2023 : स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी नको ते उद्योग सुरू असतात. अशा अनेक प्रकरणांचा पोलिस उलगडा करत असतात. आता विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पा सेंटर उघडून त्याच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचडवड येथे पोलिसांनी कारवाई करून या स्पा सेंटरचा पर्दाफाश केला. छापा टाकून त्यांनी दोन पीडितांची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी अद्याप अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी असा केला पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. 23) ही कारवाई केली. आकुर्डी येथील स्पा सेंटरवर छापा टाकत पोलिसांनी दोघींची सुटका केली. तर स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे ही कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी राकेश शिंदे,अक्षय बनकर व एक महिला आरोपी अशा तिघांना बेड्या ठोकत अटक केली. तर दोन पिडीत तरूणींची या व्यवसायामधून सुटका केली.

पैशांचै आमिष दाखवून करत होते नको ते उद्योग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही आरोपी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथे ब्लू स्टोन्स या नावाने एक स्पा सेंटर चालवत होते. मात्र त्या स्पा सेंटरच्या आतमध्ये वेगळेच उद्योग सुरू होते. आरोपी हे पीडित तरूणांनी पैशांचे आमिष दाखवायचे आणि या स्पा सेंटरच्या नावाखाली ते त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घ्यायचे. त्यांच्या जीवावर ते पैसे कमवत होते. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करून छापा टाकला. आणि दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच तीन हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?