AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche Accident : ‘बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो’, मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्तांना मोठा आदेश

Pune Porsche Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे हिट अँड रन केसची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात अनेक धक्कायक घटना घडल्या आहेत. पैशाचा वापर करुन नियम, कायदा धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालाय. आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Pune Porsche Accident : 'बिल्डर, मंत्री, आमदार कोणीही असो', मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्तांना मोठा आदेश
CM Eknath Shinde
| Updated on: May 29, 2024 | 10:40 AM
Share

पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होते आहेत. या प्रकरणात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात आहेत. अल्पवयीन आरोपी बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी कायदा, नियमांना धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालाय. आधी आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा यासाठी ड्रायव्हरला आरोपीच्या आजोबांनी डांबून ठेवलं. त्याला पैसा, बंगला अशी आमिष दाखवली. ड्रायव्हरच्या पत्नीमुळे हा सर्व प्रकार उघड झाला. ड्रायव्हरने सुद्धा गुन्हा अंगावर घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याची कबुली दिली. यासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर्सना अटक करण्यात आली.

आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. आरोपीचे बल्ड सॅम्पल चक्क कचऱ्याच्या डब्ब्यात फेकण्यात आलं. अल्पवयीन आरोपीने आपल्या भरधाव पोर्शे कारने दुचाकीला उडवलं. यात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. घटनेच्यावेळी आरोपी दारुच्या नशेत होता. पब पार्टीमध्ये तो दारु पित असल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. ब्लड सॅम्पलमुळे आरोपी घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता की, नाही? हे समजणार होतं. त्यामुळे चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न झाला. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केलीय.

पुणे पोलीस आयुक्तांना काय निर्देश?

पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलीस आयुक्तांना थेट निर्देश.

संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवणार का?

या प्रकरणात संघटीत गुन्हेगारीचे कलम वाढवता येईल का? यावरही वरिष्ट पातळीवर विचार सुरू आहे. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्र्यांकडून पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. दरे गावातून निघाल्यानंतर मुख्यमंत्री पुण्यात घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची व्याप्ती पाहणार असल्याचीही सूत्रांची माहिती.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.