
पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे लोकांच्या मनात रोष, संताप आहे. सोमवारी सकाळी 5.30 च्या सुमारास स्वारगेट एसटी डेपो परिसरात ही घटना घडली. पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानक परिसरात फलटणला जाणाऱ्या बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. तो तरुणीला बस कुठे लागते ते दाखवण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरु आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं स्थापन केली आहेत. पण अजूनही आरोपीला पकडता आलेलं नाही. म्हणून पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्या 1 लाख रुपयांच इनाम जाहीर केलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आणि तरुणीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीची ओळख पटवली. त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे आहे. आरोपीच गुन्हेगारीशी जुनं नातं आहे. तो हिस्ट्रीशीटर आहे. आरोपी दत्तात्रय गाडे जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी त्याने हा दुसरा गुन्हा केला. दत्तात्रय गाडे 2019 जामिनावर बाहेर आला होता.
आरोपीवर आधीपासून कुठले गुन्हे?
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय दत्तात्रय रामदास गाडेवर पुणे आणि आसपासच्या परिसरात चोरी, दरोडेखोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. 2024 साली दत्तात्रय गाडे विरोधात पुण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्या चौकशीसाठी त्याला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं.
नेमकं काय घडलेलं?
पीडित मुलगी फलटणला जाणारी बस पकडण्यासाठी स्वारगेट एसटी डेपोमध्ये आली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी ओळख केली. “कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं” “त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तुम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत गेली” “मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ती मुलगी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि दुष्कृत्य केलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.