Pune Crime : मूल होत नाही म्हणून सासऱ्यानेच सुनेकडे केली नको ती मागणी, अख्ख पुणे हादरलं!

पुण्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपल्या सुनेकडे नको ती मागणी केल्याचे उघड झाले आहे. पती आणि सासू यांनी देखील तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने सहकार नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी फरार आहेत.

Pune Crime  : मूल होत नाही म्हणून सासऱ्यानेच सुनेकडे केली नको ती मागणी, अख्ख पुणे हादरलं!
पुणे क्राईम
Updated on: Sep 12, 2025 | 4:29 PM

पुणे तिथे काय उणे ! असं म्हणतात खरं, पण विद्येचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्याची गुन्ह्यांमुळे सध्या दुष्किर्तीच होत आहे. पुण्यात कित्येक दिवसांपासून खून, बलात्कार, मारामा्या,टोळीयुद्ध सुरू आहेत. नुकतंच आंदेकर टळीने 20 वर्षांच्या आयुष कोमकरची हत्या केली. ते प्रकरण गाजत असतानाच आता पुण्यातून आणखी एक भयानक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी केली. माझा मुलगा तुला बाळ देण्यास समर्थ नाही, त्यामुळे मी तुला गरोदर करत असे म्हणत त्या इसमाने सुनेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला . धक्कादायक गोष्ट म्हणजे सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्या महिलेचा पती आणि तिची सासूदेखील महिलेवर दबाव आणत असल्याचे उघड झाले आहे. मे ते जून 2025 या कालावधीत ही घटना घडली.

यासंदर्भात पीडित महिलेने सहकार नगर पोलीस ठाण्यात निवृत्त पोलिस आयुक्त तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिचा सासरा, पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्रही ही घटना उघड झाल्यानंतर संबंधित आरोपी कुटुंब घराल कुलूप लावून फरार झालं आहे. पोलिसा त्यांच्या शोध घेत आहेत.

पती मूल होण्यास सक्षम नसल्याचे लपवत लावले लग्न

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 30 वर्षांची असून तिचा विवाह मे 2025 मध्ये आरोपी मुलाशी झाले. मात्र आपला पती मूल होण्यास सक्षम नसल्याचं लग्नानंतर महिलेला समजलं. त्याच्या आई-वडिलांना ही गोष्ट माहीत होती, तरी त्यांनी फसवून पीडितेचा त्या मुलाशी विवाह लावून दिला. त्या महिलेचे सासर हे निवृत्त पोलीस निरीक्षक असून ते एके दिवशी अचान सुनेच्या बेडरूममध्ये शिरले. माझ्या मुलापासून तुला मूल होऊ शकत नाही, पण मी तुला मूल देऊ शकतो, असं म्हणत त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिचा हात धरून बळजबरीही करण्याचा प्रयत्न केला

नवरा, सासूही आणायची दबाव

पीडितेने त्यांना ठाम नकार दिल्यावर,याचे परिणाम भोगायला तयार रहा अशी धमकी त्यांनी महिलेला दिली. धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडितेचा नवा आणि सासू यांनीही तिच्यावर सासऱ्यांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. मात्र या घटनेमुळे , त्रासामुळे पीडित महिला अखेर तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने सहकार नगर पोलिस स्टेशन गाठत सर्व प्रकार कथन केला आणि तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी निवृत्त पोलिसी अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आह. ते तिघेही सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.