मुख्याध्यापकाकडून 14 वर्षे मुलींचे लैंगिक शोषण; सत्य माहिती असूनही सगळे ग्रामस्थ चिडीचूप; का ते जाणून घ्या

| Updated on: Mar 09, 2022 | 5:04 PM

मुख्याध्यापकाच्या या लैंगिक छळाच्या प्रकारात अनेक विद्यार्थिनी सापडल्या असल्याचे बोलले जात आहे. कुटुंबीची बदनामी होऊ नये यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली गेली नसली तरी मुख्याध्यापकाच्या वासनेच्या बळी किती मुली आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुख्याध्यापकाकडून 14 वर्षे मुलींचे लैंगिक शोषण; सत्य माहिती असूनही सगळे ग्रामस्थ चिडीचूप; का ते जाणून घ्या
Harassment
Image Credit source: TV9
Follow us on

चंदीगडः नुकताच सगळ्या जगात महिलांविषयी आदराची भावना ठेऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. तर पंजाबमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. पंजाब (Panjab) राज्यातील नांगलमध्ये एका शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापकांने मागील 14 वर्षांपासून विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण (Harassment) केले आहे. बदनामी आणि भीतीपोटी कुणीही या मुख्याध्यापकाविरोधात (Head Master) पोलिसात तक्रार देण्याचे धाडस कुणी दाखवले नाही.

मुख्याध्यापकाच्या या लैंगिक छळाच्या प्रकारात अनेक विद्यार्थिनी सापडल्या असल्याचे बोलले जात आहे. कुटुंबीची बदनामी होऊ नये यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली गेली नसली तरी मुख्याध्यापकाच्या वासनेच्या बळी किती मुली आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बदनामीला घाबरले

या प्रकरणाबद्दल गावातील लोकांना विचारले की, तुम्ही पोलिसांकडे का गेला नाहीत. त्यावर ते म्हणाले की, गावातील याबाबतीत दोन मतप्रवाह होते. त्यामुळे मुलींची बदनामी होईल म्हणून कुणीही तक्रार केली नाही.

पत्रकाराचा दबाव

हे प्रकरण एका पत्रकारामुळेही दाबले गेले असल्याचे बोलले जात आहे. मुख्याध्यापकाने ज्या मुलींचे लैंगिक शोषण केले होते, याबाबतचे सगळे पुरावे नष्ट करण्याचे काम अमृतपाल धीमान या स्थानीक पत्रकाराने केले असल्याचा आरोप आता स्थानिक करत आहेत.

कित्येक वर्षे विद्यार्थिनींचा छळ

नांगलमधील लैंगिक छळाचे प्रकरण ज्या पत्रकारामुळे दाबले गेले तो पत्रकार सध्या फरार आहे, तर नांगलमधील नरेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील नरेश कुमारने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ या प्रकरणात आरोपी असलेल्या पत्रकार धीमानला दिले होते. नांगलमधील हे लैंगिक शोषणाचे प्रकरण इतके गंभीर आहे की, 2015 मध्ये दोन अश्लिल सीडी आणि फोटो तयार करण्यात आले होते, त्यानंतर ते पकडण्यातही आले होते. त्यावेळी हे प्रकरण पोलिसात घेऊन चला असे काही नागरिकांना सांगितले होते, मात्र अब्रुच्या भीतीने पोलिसात कुणीही तक्रार दिली नाही.

एसआयटी स्थापन करण्याची मागणी

नांगलमध्ये मागील महिन्यात शाळेतील तीन विद्यार्थिनींचे दोनशेच्या वर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर 54 वर्षाच्या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली. पंजाबमधील ही शाळो मोठी असल्याने तेथील राज्य सरकारने या प्रकणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तर काहींच्या मते या शिक्षकाचे संबंध राजकारणतील अनेक बड्या व्यक्तींबरोबर त्यांचे जवळच संबंध आहेत.

संबंधित बातम्या

TET Exam Scam | एकाच एजंट ‘1126’ परीक्षार्थींना पास केल्याचं तपासात उघड; अपात्र परीक्षार्थींचा शोध सुरु

CCTV | भरधाव बसची मागून धडक, कॉलेज विद्यार्थिनीचा करुण अंत

आंब्याच्या झाडावर आयुष्याची अखेर, तलाठ्याची शेतात आत्महत्या, सकाळी पत्नीसमोर भयावह दृश्य