AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terrorist Arrest | पोलिसांना मोठं यश, दहशतवादाच मॉड्युल उधळलं, काही करण्याआधीच 4 अतिरेक्यांना अटक

Terrorist Arrest | कोणी रचलेल कारस्थान?. काय प्लानिंग होतं?. या दहशतवाद्यांना भारतात मदत कशी पोहोचली?. भारताला हादरवून सोडण्याचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी दहशतवादाच एका मॉड्यूल उधळून लावलय. पोलिसांनी तात्काळ ऑपरेशन करुन चौघांना अटक केली.

Terrorist Arrest | पोलिसांना मोठं यश, दहशतवादाच मॉड्युल उधळलं, काही करण्याआधीच 4 अतिरेक्यांना अटक
Terror Modul Busted
| Updated on: Oct 28, 2023 | 1:20 PM
Share

मोहाली : भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा एक मोठा कट उधळला गेलाय. मोहालीमधून बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. पंजाबला हादरवून सोडण्यासाठी या दहशतवाद्यांना पाठवण्यात आलं होतं. पंजाबची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी या लोकांना काही जणांच्या टार्गेट किलिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या दहशतवाद्यांच कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडलेलं आहे. मोहालीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार दहशतवादी लपले होते. पंजाब पोलिसांना गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर 4 दहशतवादी असल्याची माहिती समोर आली. पंजाब पोलिसांनी तात्काळ ऑपरेशन करुन चौघांना अटक केली. दहशतवाद्यांकडे काही संशयास्पद वस्तू आणि नाव मिळाली आहेत. टार्गेट किलिंगची जबाबदारी या दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली होती.

हे दहशतवादी थेट पाकिस्तानात लपून बसलेला दहशतवादी हरविंदर रिंदाच्या संपर्कात होते. तो तिथून या दहशतवाद्यांची मदत करत होता. हरविंदर रिंदा ISI च्या मदतीने या दहशतवाद्यांना शस्त्र आणि आर्थिक मदत पोहोचवत होता. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून 6 पिस्तुल आणि 275 जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत. पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने त्यांना शस्त्र आणि आर्थिक मदत पोहोचवली जात होती. सोशल मीडिया हँडलवर दोन पोस्ट

पंजाब पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या बातमीची पृष्टी करताना दोन पोस्ट केल्या आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंजाब पोलिसांनी सांगितलं. पंजाबमध्ये बॉर्डरजवळ ड्रग्स आणि शस्त्रास्त्र ड्रोनच्या माध्यमातून पोहोचवली जायची. पोलिसांनी अनेकदा हा प्रयत्न उधळून लावलाय. सध्या या दहशतवाद्यांची चौकशी सुरु आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.