Mumbai Maharashtra News Live | मराठा कार्यकर्ते आक्रमक, चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

| Updated on: Oct 29, 2023 | 7:15 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : आज शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Mumbai Maharashtra News Live | मराठा कार्यकर्ते आक्रमक, चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथ्या दिवशीही आहे.  मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु आहे. इस्त्रायलने गाजावर रात्री बॉम्ब हल्ले केले.  रोहित पवार यांनी सुरु केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाच्या चौकशीसाठी  नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल राज्य शासनाला दिला आहे. कल्याण लोकसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा अचानक दौरा केला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. सह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Oct 2023 09:16 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दाखवले काळे झेंडे

    कोल्हापूर : अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करता मुख्यमंत्री शिंदे यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

  • 28 Oct 2023 09:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मराठा समाजाचा कँडल मार्च

    ठाणे : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात मराठा समाजाने कॅन्डल मार्च काढला. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सहा वाजेपर्यंत अपेक्षित होती. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही उत्तर न आल्यामुळे हा कॅन्डल मार्च काढण्यात आला.

  • 28 Oct 2023 08:51 PM (IST)

    मंत्री अतुल सावे यांना मराठा आंदोलकांनी पिटाळले

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलकांनी जयभवानी नगर परिसरातून मंत्री अतुल सावे यांना पिटाळून लावले. एका कार्यक्रमासाठी मंत्री अतुल सावे आले होते. त्यांना पाहून मराठा आंदोलक आक्रमक झाले. घोषणाबाजी करून या तरुणांनी अतुल सावे यांना पिटाळले. त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोटारसायकलवर बसून पळ काढावा लागला

  • 28 Oct 2023 08:18 PM (IST)

    मराठा कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना कल्याणमध्ये काळे झेंडे दाखवले

    कल्याण | कल्याण पश्चिमेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. कल्याण टिळक चौक परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काही जण काळे झेंडे घेऊन दाखल झाले. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 28 Oct 2023 07:46 PM (IST)

    वसई-विरारच्या पाण्यासाठी राज ठाकरे यांचा MMRDA च्या अधिकाऱ्याला फोन

    विरार : वसई-विरारच्या पाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी MMRDA अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 8 दिवसात सूर्या धरणाचे पाणी सुरू नाही झाले तर मला तिथे जावं लागले असा, इशारा राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रावरी पाण्यासाठी वसई विरार महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 8 दिवसात जर पाणी नाही आले तर वसई विरारकरांसाठी मी स्वत:च्या अंगावर केस घ्यायला तयार आहे, असा इशाराच शर्मिला ठाकरे यांनी प्रशासनासह सरकारला दिला होता. पत्नीच्या दशाऱ्या नंतर स्वत: राज ठाकरे यांनी आज MMRDA अधिकारी यांना फोन केल्याने लवकरच वसई-विरारकरांना पाणी मिळेल, असा आशावाद निर्माण झालाय.

  • 28 Oct 2023 07:42 PM (IST)

    कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता

    लासलगाव (नाशिक) : कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. कांद्याचे बाजार भाव वाढताच अघोषित निर्यात बंदी सुरु झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. कारण कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकाराच्या वाणिज्य मंत्रालयाने निर्यातीवरील मूल्य वाढवले आहे. कांदा निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन 800 डॉलर वर गेलं आहे. हे दर 31 डिसेंबर पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव घसरणाची शक्यता आहे.

  • 28 Oct 2023 07:28 PM (IST)

    नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

    जळगाव | “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव आमचे पंतप्रधान असताना आजच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त होते. मात्र सध्या कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.  मित्रोंच्या माध्यमातून सर्व देश विकायचा प्रयत्न या भाजप सरकारचा सुरू आहे. 20हजार कोटी रुपये अदानीच्या खात्यात आले कुठून?”, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला. भाजपाची कृती शेतकरी संपवण्याची

  • 28 Oct 2023 06:50 PM (IST)

    छत्तीसगडमध्ये जनसभेला संबोधित करताना राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

    छत्तीसगड: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, “दोन प्रकारची सरकारे आहेत, एक सरकार जे गरीब, शेतकरी, बेरोजगार तरुणांच्या मदतीसाठी आपली शक्ती पणाला लावते. दुसरे सरकार जे अब्जाधीश, अदानी सारख्या लोकांना मदत करण्यात कुठलीही कसर सोडत नाहीत. पंतप्रधान येतात आणि मोठमोठी आश्वासने देतात. सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे बोलले होते. एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

  • 28 Oct 2023 06:45 PM (IST)

    भावा-बहिणीची मुळं भारताची नसून इटलीची आहेत: अमित शाह

    काँग्रेस कधीच काही सकारात्मक पाहत नाही. हे भाऊ-बहीण (राहुल-प्रियांका) देशभर फिरत राहतात आणि काय झाले ते विचारत राहतात, बरं त्यांना समजणार नाही कारण त्यांची मुळं भारतातील नाहीत तर इटलीतील आहेत.

  • 28 Oct 2023 06:30 PM (IST)

    सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाक सोमवारी निर्णय

    दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 30 ऑक्टोबर रोजी निकाल देणार आहे. सिसोदिया सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत.

  • 28 Oct 2023 06:13 PM (IST)

    इतकी बौद्धिक दिवाळखोरी का असावी? त्या व्हिडीओनंतर फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

    लोकं सातत्याने कंटेंट शेअर करत असतात. सोशल मीडियावर तुम्हाला सातत्याने कंटेंट द्यावा लागतो. खरं तर हा व्हिडीओ शेअर करण्याची आवश्यकता नव्हती. पण जे लोकं हे सांभाळतात त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. त्यांना याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. त्यानंतर बरीच चर्चा रंगली. पण कोणाला जरा सत्तेत यायचं असेल तर तो हा व्हिडीओ शेअर करून येईल का? म्हणून मी बौद्धिक दिवळखोरी म्हंटलं..

  • 28 Oct 2023 05:59 PM (IST)

    मराठा आरक्षणाप्रश्नी विशेष अधिवेशन घ्या -रोहित पवार

    मराठा आरक्षणाप्रश्न राज्यात गेल्या तीन दिवसांत 6 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण नेते याप्रकरणात काहीच बोलत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • 28 Oct 2023 05:33 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

    मुंबईत रस्ते तयार करताना महाघोटाळा गेल्यावर्षी जनतेसमोर आणला. त्यामुळे मुंबई महापालिकेचे किमान एक हजार रुपये वाचले. अन्यथा खोके सरकारने हा पैसा कंत्राटदाराच्या घशात घातला असता, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या कामासाठी आगाऊ मोबदला द्यायचा आणि नंतर कामाचा खर्च वाढवायचा असा राज्य सरकारचा डाव मोडल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • 28 Oct 2023 05:17 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातच निवडणुका

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणुका होतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मी पुन्हा येईन हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर तो काढण्यात आला. त्यानंतर राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर त्यावर पडदा पडला आहे.

  • 28 Oct 2023 05:04 PM (IST)

    उपचार घेण्यास जरांगे पाटील यांचा नकार

    डॉक्टरांकडून उपचार घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हातून जरांगे पाटील हे केवळ पाणी प्यायले आहे. सरकारचं ऐकून मराठा समाजाविरोधात कोणी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

  • 28 Oct 2023 04:58 PM (IST)

    आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न

    आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न केला.

  • 28 Oct 2023 04:54 PM (IST)

    अण्णा हजारे यांचा उपोषण सोडवणाऱ्या गिरीश महाजन यांची जादू संपली – नाना पटोले यांचा टोला

    अण्णा हजारे यांचे आंदोलन असेल किंवा इतर वेळी भाजप हा गिरीश महाजन यांचा संकट मोचक म्हणून उपयोग करायचा. पण आता याच संकटमोचक महाजनांची परिस्थिती गंभीर आहे, असा चिमटा काढत नाना पटोले यांनी टोला लगावला.

    गिरीश महाजन यांचं कुणीच ऐकायला तयार नाही, उलट आंदोलन तीव्र होत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

  • 28 Oct 2023 04:40 PM (IST)

    सराफा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकणाऱ्यांना तीन वर्षांनी अटक

    लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं सराफा व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून सोनं आणि पिस्तूल पळवणाऱ्या तिघांना तीन वर्षानंतर अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींकडून 18 लाख रुपयांचे सोनं आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आली.

  • 28 Oct 2023 04:27 PM (IST)

    मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठवाड्यातील शिवसेना आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

    मराठवाड्यातील शिवसेना आमदार सोमवारी यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात ही भेट होणार असल्याचे समजते.

  • 28 Oct 2023 04:14 PM (IST)

    महायुती सरकार मराठा आरक्षण देणार पण त्यासाठी आंदोलकांनीही संवादाची भूमिका ठेवली पाहिजे – उदय सामंत

    आमचं महायुती सरकारच मराठा आरक्षण देणार आहे पण त्यासाठी आंदोलकांनीही संवादाची भूमिका ठेवली पाहिजे… आम्ही आंदोलकांचा उद्रेक समजू शकतो पण जरांगे पाटलांनी शासनाशी डायलॉग सुरू ठेवायला हवा, असं उदय सामंत म्हणाले. विरोधकांना या विषयावर फक्त राजकारणच करायचं आहे अशी टीकाही त्यांनी केली.

  • 28 Oct 2023 04:04 PM (IST)

    चित्रा वाघ यांचं गुहागर मतदार संघात जंगी स्वागत

    भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांचं गुहागर विधानसभा मतदार संघात जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चित्रा वाघ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. या मेळाव्यासाठी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित आहेत.

  • 28 Oct 2023 04:00 PM (IST)

    मराठा आरक्षणाचा विषय येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी आशा- तानाजी सावंत

    मराठा आरक्षणाचा विषय येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी मला आशा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, केंद्रातले नेते उपोषण आणि स्तिथीवर बारीक लक्ष ठेवून आहेत यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

  • 28 Oct 2023 03:45 PM (IST)

    ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडली

    ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडली. पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते मादळमोही येथे त्यांची संतप्त मराठा तरुणांनी गाडी फोडली. गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचं वातावण झालं होतं.

  • 28 Oct 2023 03:30 PM (IST)

    तुम्ही ज्यांना विठ्ठल म्हणत होता त्याला तुम्ही डिक्टेटर म्हणता

    तुम्ही ज्यांना विठ्ठल म्हणत होता त्याला तुम्ही डिक्टेटर म्हणता. विकासासाठी गेला पण ही विचारांची लढाई, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता अजीत पवारांवर टीका केलीये.

  • 28 Oct 2023 03:13 PM (IST)

    वन कर्मचाऱ्यावर हत्तीने केलेल्या प्रतिहल्ल्यात वन कर्मचारी ठार

    हत्ती उसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर हत्तीने केलेल्या प्रतिहल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश पाटील जागीच ठार झाला आहे. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे ही घटना घडली आहे. गेले आठ दिवस घाटकरवाडी परिसरात घातला आहे हत्तीने धुमाकूळ घातला होता.

  • 28 Oct 2023 02:58 PM (IST)

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी आत्महत्त्या करू नका- जरांगे पाटील

    मराठा आरक्षणासाठी कोणीच आत्महत्त्या करू नये. मराठ्यानी लढून हे आरक्षण मिळवाचे आहे. मराठा आरक्षणाचा लढा हा शांततेतच लढायचा आहे असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 28 Oct 2023 02:46 PM (IST)

    Maratha Reservation : गोडगोड बोलून आरक्षणापासून लांब ठेवलं- जरांगे पाटील

    मराठा समाजा प्रमाणेच धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षणाची गरज आहे मात्र सरकारणे गोडगोड बोलून या समाजालाही आरक्षणापासून दूर ठेवलं आहे. धनगर आणि मराठा समाज एकत्र आल्यास दोघांनाही न्याय मिळू शकतो.

  • 28 Oct 2023 02:38 PM (IST)

    Maratha Reservation : मराठा आंदोलनाला गांभिर्यानं घ्या- जरांगे पाटील यांचा इशारा

    मराठा आंदोलन हे दिवसंदिवस तिव्र होत जाणार आहे. या आंदोलनाचा गांभिर्यानं घ्या अन्यथा पुढे जावून तुम्हाला हे आंदोलन खुप महागात पडणार आहे. असा इशारा मनोज जरांगो पाटील यांनी सरकारला दिला आहे.

  • 28 Oct 2023 02:32 PM (IST)

    Jarange Patil : सरकारकडे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सरकारला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर येण्यासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार जनतेशी किती प्रामाणिक आहे हे आज दिसून येणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

  • 28 Oct 2023 02:23 PM (IST)

    Maratha Reservation : हजारो लोकं आमरण उपोषणाला बसणार- जरांगे पाटील

    मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तीसरा दिवस आहे. त्यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरविली आहे. 31 ऑक्टोबरपासून आंदोलन तिव्र करण्यात येणार आहे. यामध्ये ठिकठीकाणी हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आमरण उपोषणाला बसणार आहेत.

  • 28 Oct 2023 01:36 PM (IST)

    शिंदे साहेबांमुळे भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली – आमदार संजय गायकवाड

    राज्यातील सरकार कायदेशीर काम करीत आहे. संजय राऊत यांनी वकीलांकडे ट्यूशन लावावी. येत्या निवडणूका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील असे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

  • 28 Oct 2023 11:59 AM (IST)

    अजित पवार काही समाजापेक्षा मोठे नाहीत- मनोज जरांगे पाटील

    “अजित पवार काही समाजापेक्षा मोठे नाहीत. समाज मोठा आहे आणि अजित पवार यांना दुःख झालं का? त्यांनी कार्यक्रम रद्द केला तर काय झालं? मराठा पोरं जीव देत आहेत. समाजाच्या काळजावर जखमा झाल्या आहेत,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलं, त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

  • 28 Oct 2023 11:55 AM (IST)

    दीपक केसरकरांनी शरद पवारांची भेट घेतली

    मंत्री दीपक केसरकरांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

  • 28 Oct 2023 11:50 AM (IST)

    आज सहा वाजेपर्यंत सरकारकडून उत्तराची वाट पाहीन- जरांगे पाटील

    “आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा समाज बसणार आणि हे देशातील मोठे आंदोलन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 ऑक्टोबरला ठरणार आहे. उपोषणामुळे पोटात त्रास होत आहे. परंतु माझ्या समाजाच्या पोरांनाही त्रास होत आहे. आज सहा वाजेपर्यंत सरकारकडून उत्तराची वाट पाहीन. माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन सरकारने प्रामाणिकपणा दाखवावा. मला अजूनही सरकाच्या वतीने फोन किंवा निरोप नाही,” असं जरांगे पाटलांनी सांगितलं.

  • 28 Oct 2023 11:40 AM (IST)

    अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलं

    अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यात जाणं टाळलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधामुळे अजित पवारांनी जाणं टाळलं. अजित पवार गळीत हंगामा शुभारंभाला जाणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.

  • 28 Oct 2023 11:30 AM (IST)

    उपोषणादरम्यान जीविताला धोका झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार- जरांगे पाटील

    “कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने आपल्या गावात यायचं नाही आणि आपणही कोणा नेत्याच्या दारात जायचं नाही. आमरण उपोषणात कोणाच्या जीविताला धोका झाला तर त्याला राज्यसरकार जबाबदार सरकार राहील,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

  • 28 Oct 2023 11:20 AM (IST)

    साखळी उपोषण सुरू आहे त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू करा- मनोज जरांगे पाटील

    साखळी उपोषण सुरू आहे त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू करा. संपूर्ण गावांनी उपोषणात सहभागी व्हावं. कोणत्याही मराठा नेत्यांना गावात येऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा संघटनांना केलं आहे. कुणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशीही विनंती त्यांनी केली.

  • 28 Oct 2023 11:10 AM (IST)

    धनगर समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

    धनगर समाजाने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यशवंत सेनेचे पदाधिकारी अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.

  • 28 Oct 2023 10:57 AM (IST)

    पंढरपुरात मराठा समाजाचा कॅण्डल मार्च

    मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील बोहाळी गावात कॅण्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गाव बंदी केली आहे. आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचे आणि राजकीय नेत्याला गावात येऊ न देण्याची गावकऱ्यांनी शपथ घेतली आहे.  बोहाळी गावात कॅण्डल मार्च काढून सरकारचा निषेध करण्यात आला.  बोहाळी गावातील सर्व मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आहे.

  • 28 Oct 2023 10:54 AM (IST)

    कांद्याचे भाव वाढले

    नवीन कांदा बाजारात आला नसल्याने कांद्याचे भाव वाढले. किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे. जर नवीन कांदा लवकर बाजारात आला नाही तर कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात. पुण्यातील मंडईत कांदा चढ्या दराने विक्री होतेय.

  • 28 Oct 2023 10:48 AM (IST)

    यशोमती ठाकूर यांचा भाजपवर निशाणा

    जर एकनाथ शिंदे अपात्र झाले आणि दुसर कोणी भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. भाजप बहुजनांचा उपयोग करून घेतो आणि नंतर त्यांना फेकून देतो हे सरकार अवैध मार्गाने आले आहे, असं म्हणत भाजपने केलेल्या भाजपच्या  कालच्या ट्विटवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  समाजामध्ये समाजामध्ये भांडण लावण्याचे काम भाजपच्या वतीने केलं जात आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

  • 28 Oct 2023 10:30 AM (IST)

    जालना जिल्ह्यात 309 गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी

    मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं. त्यानंतर जालना जिल्ह्यात 309 गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 120 गावात साखळी उपोषण सुरु आहे. तर 119 गावात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला.

  • 28 Oct 2023 10:15 AM (IST)

    अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाने खळबळ

    सोशल मीडियावर अश्लील पोस्ट लाईक करणं, अपराध नाही, असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरच्या एका गुन्ह्यासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय दिलाय.  अश्लील पोस्ट लाईक करणे अपराध नाही मात्र शेअर करणे किंवा पुन्हा पोस्ट करणे हा मात्र अपराध आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.  अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाची सोशल मीडियातही चर्चा आहे.

  • 28 Oct 2023 09:55 AM (IST)

    Live update | प्रवासी कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वे 5 ते 8 मिनिटे उशिराने

    पश्चिम रेल्वे 5 ते 8 मिनिटे उशिराने धावत आहे. परंतु नेहमीप्रमाणे रेल्वे गाड्या धावत असल्याची माहिती मिळत आहे.

  • 28 Oct 2023 09:41 AM (IST)

    Live update | ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचं साखळी उपोषण

    ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाकडून साखळी उपोषण केलं जात आहे. मराठा समाजाचे आजपासून राज्यभर साखळी उपोषण… जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभर साखळी उपोषण

  • 28 Oct 2023 09:21 AM (IST)

    Live update | अजित पवार माळेगाव साखर कारखान्यात जाणार की नाही अशी चर्चा

    अजित पवार माळेगाव साखर कारखान्यात जाणार की नाही अशी चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमाचं अजित पवार यांना निमंत्रण आहे. पण अजित पवार यांच्या हस्ते मोळीपूजन करण्यासाठी मराठा आंदोलकांचा विरोध आहे.

  • 28 Oct 2023 09:08 AM (IST)

    Live update | नाशकात कांद्याने गाठली उच्चांकी

    नाशकात कांद्याने उच्चांकी गाठली आहे. आवक घटल्याने कांदा भावात तेजी पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात कांद्याची 50 रु ते 70 किलोने विक्री होत आहे. साठवणुकीतील कांदा सडल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. आणखी काही दिवस भाव असेच तेजीत राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

  • 28 Oct 2023 08:59 AM (IST)

    Air pollution | मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली

    मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून माहुल येथील इंधन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मर्यादित, मे. टाटा पॉवर कंपनी, एजिस लॉजिस्टिक्स व सिलॉर्ड कंटेनर्स या आस्थापनांचा समावेश आहे.

  • 28 Oct 2023 08:32 AM (IST)

    Manoj jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

    मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

  • 28 Oct 2023 08:29 AM (IST)

    Chhatrapati Shivaji Maharaj | 350 गडकिल्ल्यावर तिरंगा आणि भगवा फडकणार

    छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून 350 गडकिल्ल्यावर तिरंगा आणि भगवा फडकवला जाणार. 26 जानेवारीला प्रत्येक गडकिल्ल्यावर राबवणार मोहीम. गिर्यारोहण महासंघाने केली घोषणा.

  • 28 Oct 2023 08:12 AM (IST)

    Solapur news | सोलापूरमधला ड्रग्स कारखाना उद्धवस्त

    नाशिक पोलिसांकडून सोलापूरमधला एमडी ड्रग्स कारखाना उद्धवस्त. सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची मिळाली होती माहिती. कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चा माल पोलिसांनी घेतला ताब्यात. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर केली कारवाई. नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन केली कारवाई.

  • 28 Oct 2023 07:57 AM (IST)

    Maharashtra News | वाशिमजवळ ट्रक जळून खाक

    वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. ट्रकने समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकला आग लागली.

  • 28 Oct 2023 07:45 AM (IST)

    Maharashtra News | शिंदे समितीला आणखी पुरावे सापडले

    मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीला कुणबीचे आणखी पुरावे सापडल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे समितीला आत्तापर्यंत दहा हजार कुणबी पुरावे सापडल्याची माहिती आहे. यापूर्वी समितीकडे पाच हजार कुणबी पुरावे मिळाले होते.

  • 28 Oct 2023 07:38 AM (IST)

    Maharashtra News | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली

    मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे.

  • 28 Oct 2023 07:25 AM (IST)

    Maharashtra News | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक दौरा

    कल्याण लोकसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दौरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. साहेब आपण सत्तेत असताना पोलिस आमच्यासोबत दुजाभाव करत आहेत. प्रशासन डावलतय असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

  • 28 Oct 2023 07:20 AM (IST)

    Maharashtra News | रोहित पवार यांची यात्रा स्थगित

    युवकांच्या प्रश्नांसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यात सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Published On - Oct 28,2023 7:16 AM

Follow us
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.