AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवासमोर 200 रुपयांची नोट ठेवून विचारला एक प्रश्न; उत्तर मिळताच नवरीने मोडलं लग्न, असा कोणता होता सवाल?

नवरदेवासमोर 200 रुपयांची नोट ठेवून विचारला एक प्रश्न; उत्तर मिळताच नवरीने मोडलं लग्न... मुलीच्या नातेवाईकांनी देखील नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे.... सध्या सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

नवरदेवासमोर 200 रुपयांची नोट ठेवून विचारला एक प्रश्न; उत्तर मिळताच नवरीने मोडलं लग्न, असा कोणता होता सवाल?
| Updated on: May 05, 2026 | 3:18 PM
Share

लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. कारण त्या एका दिवसानंतर मुलीचं नवीन आयुष्य सुरु होणार असतं. पण लग्न मंडपात एका मुलीसोबत असं काही झालं की, शेवटच्या क्षणी लग्न मोडण्यात आलं. लग्न झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीची पाठवणी करण्यास नकार दिला, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 200 रुपयांमुळे नवऱ्याचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं मोठं सत्य समोर आलं जे, प्रचंड हैराण करणारं होतं… ही घटना बिहार येथील मुजफ्फरनगर येथे घडली आहे. नवरीने 200 रुपयांनी नोट समोर ठेऊन असा प्रश्न विचारला, ज्यामुळे वाद टोकाला पोहोचला…

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण…

मिळालेल्या माहितीनुसार, मनियारी परिसरात, शुक्रवारी रात्री वरात आली. पारंपरिक पद्धतीनुसार, रात्रभर विधी सुरु राहिल्या. आनंदाना सर्वकाही पार पडलं. पण नवऱ्या मुलाच्या कुटुंबाने नवरीची आणि तिच्या कुटुंबियांची फसवणूक केली, ज्या मुलासोबत मुलीचे लग्न ठरलं होतं, त्याला नवरदेव म्हणून आणलंच नव्हतं. मुलीच्या घरच्यांना याबद्दल शंका होती, पण त्यांनी तो आपला भ्रम समजून गप्प बसले.

शनिवारी सकाळी पाठवणी समारंभाची तयारी सुरू झाली. त्याचवेळी एका महिलेने नवरदेवाला भेट म्हणून 200 रुपयांची नोट दिली. त्यासोबतच तिने विचारलx की, या नोटेची किंमत किती आहे. नवरदेवाने पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, ती दोन हजार रुपयांची नोट आहे. त्यानंतर, दुसऱ्याच मुलाला नवरदेव बनवून आपली फसवणूक होत आहे, या घरच्यांच्या शंकेचं रूपांतर विश्वासात झालं. फसवणूक झाल्याचं नवरीच्या कुटुंबियांनी कळलं. अशात दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाले.

नवऱ्या मुलाच्या समजदारीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले… ज्या पुरुषाला 200 आणि 2000 रुपयांचा फरक , कळत नाही, तो स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी कशी घेऊ शकतो… असा प्रश्न मुलीच्या कुटुंबियांनी उपस्थित केला. समोर आलेल्या माहिनुसार, मुलाचं दुसऱ्या ठिकाणी लग्न होत नव्हतं, म्हणून अशी फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे… वाद टोकाला गेल्यानंतर कुटुंबियांनी मुलीची पाठवणी करण्यास नकार दिला.

नाही झाली नवरची पाठवणी…

झालेल्या वादानंतर मुलीची पाठवणी करण्यात आली आहे… नवऱ्या मुलाचे कुटुंबिय देखील खाली मान घालून तेथून निघून गेले. घडलेल्या घटनेनंतर नातावाईकांमध्ये आणि शेजारच्यांमध्ये संतापचं वातावरण आहे. मुलाच्या कुटुंबियांनी असं करायला नको होतं… असं अनेकांच म्हणणं आहे. नवरीला सांगण्यात आलं की, नवरदेव दुसराच कोणीतरी आहे. जेव्हा लग्नाची वेळ झाली, तेव्हा त्याचे कुटुंबीय दुसऱ्याच एका पुरुषाला घेऊन आले, त्यानंतर वधूने ते लग्न मोडलं आणि कोणतेही पुढील संबंध ठेवण्यास नकार दिला. हे प्रकरण अद्याप पोलिसांना कळवण्यात आलेलं नाही. पोलिसांनी सांगितल्यानुसार, कोणतीली ही तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत तक्रार दाखल करणार नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?