
हरियाणातील चर्चित टेनिस खेळाडू राधिका हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपपत्र सादर केले आहे. पोलिसांनी 254 पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केलं आहे. यामध्ये राधिकाची हत्या का आणि कशी केली गेली… हे सर्व सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी 35 जणांचे जबाब नोंदवले आहेत. चला जाणून घेऊया राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केली…
काय आहे आरोपपत्रात?
गुरुग्रामच्या सेक्टर-57 मध्ये कुटुंबासह राहणाऱ्या टेनिस खेळाडू राधिका यादव (25)ची 10 जुलै रोजी तिचे वडील दीपक यादव यांनी गोळी घालून हत्या केली होती. गावकऱ्यांच्या टोमण्यांना कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दीपक यादव यांना घरातूनच अटक केली होती आणि गुन्ह्यात वापरलेली रिव्हॉल्व्हरही जप्त केली होती. माजी टेनिस खेळाडू राधिका यादवच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी राधिकाचे वडील दीपक यादव यांना एकमेव आरोपी ठरवत 254 पानांचं दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. आरोपपत्रानुसार, दीपक यांनी कौटुंबाची इज्जत वाचवण्याच्या बहाण्याने आपल्या मुलीवर तीन गोळ्या झाडून तिची हत्या केली.
वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…
का केली हत्या?
तपासात समोर आलं की, वडील आणि मुलीमध्ये बराच काळ तणाव होता. दीपक वारंवार राधिकाला बाहेर जाण्यापासून आणि कोचिंग देण्यापासून रोखत होते, ज्यामुळे दोघांमधील वाद वाढत गेले. आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, गावातील लोक त्यांना टोमणे मारायचे की ते मुलीच्या कमाईवर जगत आहेत आणि तिच्या चारित्र्यावरही बोट उचलायचे. यामुळे त्यांच्या मान-सन्मानाला ठेच पोहोचत होती. याच दबावाखाली आणि इज्जत वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी हे भयंकर पाऊल उचललं.
आरोपपत्रात हेही नमूद करण्यात आलं आहे की, दीपक यांनी राधिकाला तिचं इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी तपासादरम्यान 35 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य, शेजारी आणि राधिकाचे प्रशिक्षक यांचा समावेश आहे.