Sonam Raghuwanshi : ‘मी विधवा बनीन, मग पप्पा…’, राजाच्या हत्येनंतर सोनम कुठे होती? किती हजाराची सुपारी दिलेली?
Sonam Raghuwanshi : राजला शब्द, राजाशी विश्वासघात करणाऱ्या सोनम रघुवंशीचे खतरनाक इरादे होते. नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने संपवल्यानंतर सोनम कुठे गेली? प्रियकरसोबत होता का? राजाची हत्या घडवून आणण्यासाठी किती हजाराची सुपारी तिने दिलेली? याची माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यापारी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दरदिवशी नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला अटक केली आहे. त्याशिवाय अन्य चार आरोपींना सुद्धा अटक केली आहे. पोलिसातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने मिळून हत्येचा कट रचला. लग्नानंतर अवघ्या पाच दिवसात सोनमने राजा रघुवंशीच्या मर्डरची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली.
राजा आणि सोनमच लग्न 11 मे रोजी झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्वकाही सामान्य वाटत होतं. पोलीस सूत्रांनुसार, 16 मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजाला मार्गातून हटवण्याची योजना बनवली. सोनमने राज कुशवाहला सांगितलं, राजा रघुवंशीला संपवून टाक. लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली आहे, असं भासवू. त्यानंतर मी विधवा होईन. मग पप्पा आपल्या लग्नाला मंजुरी देतील.
हत्येसाठी किती हजार दिले?
पोलीस सूत्रांनुसार राजाची ज्या कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली, ती गुवहाटीत ऑनलाइन ऑर्डर करण्यात आली होती. आरोपी घटनेच्या आधी सोनमच्या होमस्टेपासून 1 किलोमीटर अंतरावर थांबले होते. सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती. सोनमने या हत्येसाठी 50 हजाराची सुपारी दिली होती.
राजाच्या हत्येनंतर सोनमने काय केलं?
राजाची हत्या 23 मे रोजी करण्यात आली. त्याच संध्याकाळी सोनम शिलॉन्ग वरुन गुवहाटीला आली. तिथून ट्रेन पकडून वारणसी मार्गे गाजीपूरला गेली. या दरम्यान तिने आपला मोबाइल फोन पोलिसांना मिळू नये म्हणून तोडून टाकला. तपासादरम्यान सोनमच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. त्यात ती आरोपींशी बोलताना दिसतेय.
…तेव्हा सोनमला कळलं, सगळा खेळ संपलाय
CDR आणि कॉल ट्रेसिंगवरुन राज कुशवाहच लोकेशन इंदूरमध्ये आढळलं. त्याला पोलिसांनी अटक केली. राज कुशवाहला अटक होताच सोनमल कळून चुकलं, सगळा खेळ संपलाय. त्यानंतर तिने उत्तर प्रदेशच्या ढाब्यावर पोहोचून स्वत:ला सरेंडर केलं.
मेट्रोमोनियल साइटवरुन संपर्कात
सोनम आणि राजा रघुवंशीच लग्न 11 मे रोजी झालं. दोघे एका मेट्रोमोनियल साइटवरुन संपर्कात आले होते. लग्नानंतर दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले. तिथेच राजाची हत्या झाली. खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. हत्येच्या 17 दिवसानंतर खुलासा झाला. पोलिसांनुसार राजाच्या हत्येसाठी सोनमने प्रियकर राज कुशवाहची संपूर्ण मदत केली.
