बायकोच निघाली राजाच्या खुनाची मास्टरमाईंड? 3 ठोस पुरव्यांनी उडवून दिली खळबळ; सोनमचा मर्डरगेम कसा होता?
मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशीच्या खुनाबाबत रोजच नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या हाती एकूण तीन महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.

Raja Raghuwanshi Murder Case : मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी याचे खूनप्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. मेघालयमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी आपल्या पत्नीसोबत गेलेला असतानाता त्याचा मृतदेह खोल दरीत सापडला. त्याच्या या खुनामागे त्याचीच पत्नी सोनम रघुवंशी असल्याचं बोललं जात आहे. तिला अटक केलं असून तिची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, राजा रघुवंशीच्या हत्येबाबत तीन मोठे पुरावे समोर आले आहेत. याच पुरव्यांच्या आधारे या हत्येची मास्टरमाईंड सोनम हीच असल्याचे बोलले जात आहे.
हनीमूनला गेला आणि मृतदेह दरीत आढळला
राजा रघुवंशी हा तिची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासोबत हनीमून साजरा करण्यासाठी गेला होता. हे दोघेही मेघालयमध्ये गेले होते. मात्र हनीमून ट्रिपमध्ये असतानाच राजा रघुवंशी याचा खून झाला. त्याचा मृतदेह थेट खोल दरीत आढळला. या खून प्रकरणात सोनम रघुवंशी हिच्यावर पोलिसांचा संशय बळावला आहे. कारण पोलिसांनी तीन महत्त्वाचे आणि मोठे पुरावे सापडले आहेत. हा खून एक पूर्वनियोजित कट असल्याचं बोललं जातंय.
सापडलेले तीन पुरावे कोणते?
राजा रघुवंशी याच्या हत्येमध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे तो म्हणजे हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र. पोलिसांनी घटनास्थळावरून एक शस्त्र जप्त केलं आहे. हे एक धारदार शस्त्र असून ते खास समूहातर्फे वापरले जाते. मेघालयमधील स्थानिक लोकांकडे हे शस्त्र असते. राजा रघुवंशी याच्या खुनासाठी मात्र या शस्त्राचा वापर अत्यंत खुबीने आणि सराईतपणे केला गेला. बाहेरच्या गुन्हेगारांनी या शस्त्राचा वापर करून तपास भटकवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मर्डर व्हॅन :
पोलिसांनी या खुनाचा तपास करताना अनेक सीसीटीव्ही तपासले तसेच मोबाईल लोकेशनही ट्रॅक केले आहे. या तपासातून राजाच्या खुनासाठी एका व्हॅनचा उपयोग केल्याचे समोर आले आहे. राजाचा खून करण्याच्या अगोदर तसेच काही तास नंतर ही व्हॅन घटनास्थळी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्हॅनमध्ये खुनाचे डाग, फायबरचे तुकडे तसेच राजाच्या सामानशी मिळतेजुळते कपडे आढळले आहेत. त्यामुळे राजाला एका ठिकाणी संपवून त्याला अन्य ठिकाणी नेण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सोनमवर संशय नेमका का आला?
सोनम आणि राजा हे दोघेही हनीमून साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र तरीदेखील त्यांनी रिटर्न तिकीट बूक केलं नव्हतं. सोनमच्या काही कृती या संशयास्पद होत्या. राजाचा खून झाल्यानंतर ती घटनास्थळावरून गायब झाली. ती थेट गाजीपूर येथे गेली. तिच्या मोबाईल रेकॉर्ड्सनुसार सोनम राज कुशवाहा याच्या संपर्कात होती. तो राजा रघुवंशी याचा कर्मचारी होता. त्यामुळेच राजाचा खून झाल्यानंतर ती घटनास्थळावरून गायब झाल्यामुळे संशयाची सुई तिच्याकडे वळली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
