मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 10 अश्लील व्हिडीओ शेअर, बापाला अटक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 20, 2021 | 11:03 AM

कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाईन वर्ग सुरु असताना शाळेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर एकामागून एक 10 अश्लील व्हिडीओ आले. याची माहिती मिळताच मुख्याध्यापक राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 10 अश्लील व्हिडीओ शेअर, बापाला अटक
प्रातिनिधीक फोटो

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. ऑनलाईन क्लास दरम्यान एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी ‘चुकून’ शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ शेअर केले. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

नेमकं काय घडलं?

जयपूरमधील या घटनेत संबंधित पित्याने आपल्या मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चुकून 10 अश्लील व्हिडीओ पोस्ट केले. ऑनलाईन क्लास दरम्यान ग्रुपमध्ये आलेले हे अश्लील व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलांच्या पालकांसह शाळा प्रशासनही आश्चर्यचकित झाले. मग शाळा प्रशासनानेच पोलिसांकडे तक्रार दिली.

मुख्याध्यापकांची पोलिसात तक्रार

जयपूरच्या मुहाना परिसरातील कल्याणपूरच्या शासकीय शाळेत ऑनलाईन वर्ग सुरु असताना शाळेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मुलांच्या मोबाईलवर एकामागून एक 10 अश्लील व्हिडीओ आले. याची माहिती मिळताच मुख्याध्यापक राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासात असे आढळून आले की, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवरुन हे अश्लील व्हिडिओ शाळेच्या ग्रुपमध्ये आले आहेत. पोलिसांनी आरोपी वडील साबीर अलीला अटक केली आहे.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागात प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालयं अद्यापही बंद आहेत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. संसर्गाच्या भीतीमुळे शाळा किंवा महाविद्यालयात जाणे शक्य नाही, म्हणून विद्यार्थी आपापल्या घरातून ऑनलाईन वर्गात सहभागी होत आहेत. परंतु अशा प्रकारांमुळे शिक्षणात व्यत्यय निर्माण होत आहेत.

आरोपीचं स्पष्टीकरण काय

दरम्यान, मोबाईलमध्ये हे अश्लील व्हिडीओ कुठून तरी आले होते आणि चुकून शाळेच्या ग्रुपमध्ये गेले, असा दावा आरोपीने केला. मुलीच्या ऑनलाईन क्लास आणि होमवर्कसाठी शाळेतून 2 फोन नंबर मोबाईलमध्ये लिंक करण्यासाठी आले होते आणि आरोपी त्यांना लिंक करत असताना चुकून हे अश्लील व्हिडीओ ग्रुपमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे.

5 वर्षांच्या कारावासाची तरतूद

पोलिसांच्या मते, हा गंभीर गुन्हा आहे आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आरोपीला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा गंभीर गुन्हा मानून पोलिसांनी आयटी कायदा आणि पॉक्सो कायद्याव्यतिरिक्त कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची टवाळी

दुसरीकडे, मुंबईतील महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. विलेपार्ले भागातील संबंधित कॉलेजचा ऑनलाईन क्लास सुरु असताना टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

पिंपरीत ऑनलाईन वर्ग सुरू असताना सुरू झालं ‘पॉर्न’, शाळांपुढे ऑनलाईन सुरक्षिततेचं आव्हान!

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI