पिंपरीत ऑनलाईन वर्ग सुरू असताना सुरू झालं ‘पॉर्न’, शाळांपुढे ऑनलाईन सुरक्षिततेचं आव्हान!

ऑनलाईन शिक्षण किती सुरक्षित आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. कारण, ऑनलाईन वर्ग सुरू असताना त्यात अचानकपणे पॉर्न सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे.

पिंपरीत ऑनलाईन वर्ग सुरू असताना सुरू झालं 'पॉर्न', शाळांपुढे ऑनलाईन सुरक्षिततेचं आव्हान!
प्रातिनिधिक फोटो

पिंपरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) गेल्यावर्षीपासून राज्यातल्या शाळा (Schools) बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यासाठी ऑनलाईन वर्गांचा (Online Education) पर्याय समोर आला. मागचं वर्षभर विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षण किती सुरक्षित आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. कारण, ऑनलाईन वर्ग सुरू असताना त्यात अचानकपणे पॉर्न (Obscene video in Online Class) सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. (The incident took place in Pimpri when Obscene video started suddenly while the online class was going on)

शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना त्यात पॉर्न सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली ही तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन शिक्षण सुरक्षित ठेवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी पिंपरीतल्या नामांकित शाळेचा ऑनलाईन वर्ग सुरू होता. या वर्गात बाहेरील एक अज्ञात व्यक्ती सहभागी झाली. त्या व्यक्तीने वर्ग सुरू असताना त्यात पॉर्न व्हिडीओ सुरू केला. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन क्लास बंद करावा लागला. पिंपरीतल्या तीन शाळांच्या बाबतीत अशीच घटना घडली. त्यानंतर शाळेने संबंधित व्यक्तीविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

मोफत सॉफ्टवेअरमुळे असे प्रकार

ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना सुरु झाल्यानंतर अनेक शाळांनी आपलीसी केली. त्यासाठी शाळांनी बाजारात उपबल्ध असलेल्या सॉफ्टवेअर्सचा उपयोग केला. पण ही सॉफ्टवेअर्स किती सुरक्षित आहेत याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. बहुतांश शाळा गुगल मीट, झूम या अॅप्सचा वापर ऑनलाईन वर्गांसाठी करतात. वर्गात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करून विद्यार्थी सहभागी होतात. पण या लिंक सुरक्षित नसल्याने त्यात बाहेरील व्यक्ती जोडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर उपाय काय?

ऑनलाईन शिक्षणासाठीचे मोफत अॅप धोकादायक आहेत हे आतापर्यंत स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा उपलब्ध असणाऱ्या अॅपचा वापर न करता शाळांनी आपल्या सोयीनुसार स्वतःचे अॅप किंवा सॉफ्टवेअर बनवून घेण्याचा सल्ला सायबरतज्ज्ञ देत आहेत. हे शक्य नसल्यास ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांव्यतिरीक्त बाहेरील व्यक्ती जोडली जाऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एका सायबर सिक्युरिटी ट्रेनरची नेमणूक करावी. ऑनलाईन वर्गाची लिंक बाहेरच्या व्यक्तीच्या हातात पडू नये यासाठी काळजी घेणं. क्लासमध्ये हजर, गैरहजर, उशीरा येणाऱ्या, लवकर जाणाऱ्यांची नोंद ठेवावी.

संबंधित बातम्या :

Jyoti Deore audio clip : ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाच्या मित्राने क्लिप व्हायरल केल्याचा दावा

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI