Jyoti Deore audio clip : ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाच्या मित्राने क्लिप व्हायरल केल्याचा दावा

ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाल्यामुळे जास्त डिप्रेशन आलं आणि 2 दिवस फोन बंद ठेवला, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झालं असून मी पूर्णपणे स्टेबल असल्याचं ज्योती देवरे यांनी म्हटलं.

Jyoti Deore audio clip : ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठा ट्विस्ट, भावाच्या मित्राने क्लिप व्हायरल केल्याचा दावा
Parner Tehsildar Jyoti Deore


अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अखेर सोडलं मैना सोडलं आहे. तीन दिवसांनी माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती ऑडिओ क्लिप चुकीने व्हायरल झाली असून, हे मानसिक उद्विघ्नेतून लिखाण केले आणि नंतर त्याची ऑडिओ क्लिप तयार केली. मात्र ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल केल्याचा दावा ज्योती देवरे यांनी केला.

ऑडिओ क्लिप चुकून भावाच्या मित्राकडून व्हायरल झाल्यामुळे जास्त डिप्रेशन आलं आणि 2 दिवस फोन बंद ठेवला, असं ज्योती देवरे यांनी सांगितलं. मात्र आता जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलणं झालं असून मी पूर्णपणे स्टेबल असल्याचं ज्योती देवरे यांनी म्हटलं.

ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप 

अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.

विशेष म्हणजे या महिला तहसिलदारांनी लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाविषयी देखील या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती दिलीय. या महिला तहसिलदारांची ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ऑडिओ क्लिपनंतर देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

निलेश लंकेंची प्रतिक्रिया 

देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय.

VIDEO

संबंधित बातम्या  

आधी आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, आता पारनेरच्या तहसीलदारांविरोधात स्फोटक अहवाल

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?

पारनेरच्या तहसीलदाराचा ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा, चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI