पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?

देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे.

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?
आमदार निलेश लंके
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 6:28 PM

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. देवरे यांनी या ऑडिओ क्लिपद्वारे कोरोना काळात चांगलेच चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता खुद्द आमदार निलेश लंके यांनीच उत्तर दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून आपल्या बचावासाठी केविलवाणा प्रयत्न केलाचा पलटवार निलेश लंके यांनी केलाय. (Nilesh Lanke’s answer On the audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore)

तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे, असं निलेश लंके यांनी म्हटलंय. यापूर्वी देखील जेव्हा तहसीलदार देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री अपरात्री केल्याचा आरोप लंके यांनी केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न केल्याचं आमदार लंके यांनी म्हटलंय. निलेश लंके यांच्या या उत्तरावरुन आता हे प्रकरण कुठलं वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झालं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

चित्रा वाघ यांच्या संतप्त सवाल

लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते. कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात. महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात. तिल्या लिपिकाला मारतात. थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला काही लोकप्रतिनिधींनी मारलं नाही. महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केलाय.

तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप

इतर बातम्या : 

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, सोमय्यांच्या दगडफेकीवर खासदार भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया

Nilesh Lanke’s answer On the audio clip of Parner Tehsildar Jyoti Deore

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.