बनावट क्लिप तयार करुन बदनामी केल्याचा आरोप, आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटीची नोटीस

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिलीय.

बनावट क्लिप तयार करुन बदनामी केल्याचा आरोप, आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटीची नोटीस
आमदार निलेश लंके
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 9:21 PM

अहमदनगर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिलीय. अविनाश फवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष आहेत. आमदार लंके यांनी वकिलामार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी 1 कोटी रुपये आणि नोटीस खर्च 5 हजार असे एकूण 1 कोटी 5 हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी केलीय (NCP MLA Nilesh Lanke give defamation notice of 1 Crore to MNS activist in Parner).

“15 दिवसात 1 कोटी 5 हजार देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा”

आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिलाय.

“बनावट ऑडिओ क्लिप करुन निलेश लंके यांची बदनामी”

निलेश लंके यांचे वकील राहुल झावरे म्हणाले, “पारनेरचे लोकप्रतिनिदी निलेश लंके मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केलीय. त्यामुळे त्यांना कायदेशीर 1 कोटीची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. आमदार निलेश लंके यांचं काम जगभर पोहचलं आहे. शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचं चांगलं उदाहरण त्यांनी उभं केलंय. अशा माणसाची बदनामी केली जात असेल तर त्याला कायदेशीर नोटीस देणं आवश्यक आहे.”

मनसे पदाधिकाऱ्याकडून लंकेंवर शिवीगाळ केल्याचा आरोप

अब्रुनुकसानीची 1 कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. तसेच आमदार निलेश लंके यांनीच फोनकरुन मला आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय.

“माझा हा व्हिडीओ राज ठाकरेंना दाखवा”

आपल्यावरील आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”

“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या. आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

निलेश लंके काका, तुमच्यामुळे माझी कोरोनाची भीती गेली, बुलडाण्याच्या बालिकेचा कोव्हिड सेंटरमध्ये वाढदिवस

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं; कोविड सेंटरची व्यवस्था पाहून जयंत पाटील भावूक

निलेश लंकेंचे कोव्हिड सेंटर आदर्श, भाजप आमदार श्वेता महालेंकडून कौतुक

व्हिडीओ पाहा :

NCP MLA Nilesh Lanke give defamation notice of 1 Crore to MNS activist in Parner

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.