आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय.

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
Parner Tehsildar Jyoti Deore
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 4:52 PM

अहमदनगर : अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.

विशेष म्हणजे या महिला तहसिलदारांनी लोकप्रतिनिधींकडून होणाऱ्या त्रासाविषयी देखील या ऑडिओ क्लिपमध्ये माहिती दिलीय. या महिला तहसिलदारांची ऑडिओ सध्या चांगलीच व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा अनेक गोष्टींवर सविस्तर कथन केलंय.

तहसिलदारांनी व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलं? पाहा

चित्रा वाघ यांच्याकडून निलेश लंकेंवर हल्लाबोल

चित्रा वाघ म्हणाल्या, “पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली आणि मन सुन्न झालं. सत्तेतले हे बेलगाम घोडे. देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधींच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होतंय का तेचं आता पहायचंय.”

“तहसिलदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं बचावासाठी प्रयत्न”

निलेश लंके म्हणाले, “तहसीदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करून केविलवाणा प्रयत्न केला. ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. तसा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवला आहे. तहसीलदारांना सूचना केल्या तर त्यांनी मला देखील आत्महत्या करण्याचे मेसेज रात्री-अपरात्री केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने बचावासाठी केलेला हा प्रयत्न आहे.”

हेही वाचा :

VIDEO: मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, नांदेडमध्ये छावाचे कार्यकर्ते ताब्यात

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

आतल्या वेदनांची जखम, नैराश्याने घात, ‘छावा’ संघटनेचा तालुकाध्यक्ष, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षापुढे हार, टोकाचं पाऊल

Parner Tehsildar audio clip allegations of MLA and senior officer in Ahmednagar

Non Stop LIVE Update
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....