Russia Attack : युक्रेनच्या तीन लढाऊ विमानांवर रशियाचा हल्ला, युद्ध आणखी भडका उडण्याची चिन्हे

| Updated on: Jul 14, 2022 | 12:57 AM

एकीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला असताना युक्रेनने मात्र या वृत्तावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही देशांदरम्यान धान्य निर्यातीवरील निर्बंध हटवण्याच्या दृष्टीने चर्चा केली जात आहे.

Russia Attack : युक्रेनच्या तीन लढाऊ विमानांवर रशियाचा हल्ला, युद्ध आणखी भडका उडण्याची चिन्हे
युक्रेनच्या तीन लढाऊ विमानांवर रशियाचा हल्ला
Image Credit source: Google
Follow us on

कीव : मागील 139 दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धा (War)ने गंभीर वळण घेतले आहे. रशियाने युक्रेनची तीन लढाऊ विमाने (Fighter Jets) पाडली आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी हा दावा केला. त्यामुळे दोन देशांतील युद्धाचा पुढच्या काही दिवसांत आणखी भडका उडण्याची चिन्हे आहेत. रशियाने एसयू-25 आणि एसयू-24 ही दोन लढाऊ विमाने पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात पाडली. त्याचबरोबर मिग-29 या लढाऊ विमानावरही हल्ला (Attack) करण्यात आला. ही सर्व लढाऊ विमाने सोव्हिएत-डिझाइन केलेली विमाने आहेत. युक्रेनच्या हवाई दलाकडून अशा प्रकारच्या लढाऊ विमानांचा वापर केला जात आहे.

एकीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला असताना युक्रेनने मात्र या वृत्तावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही देशांदरम्यान धान्य निर्यातीवरील निर्बंध हटवण्याच्या दृष्टीने चर्चा केली जात आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर संपूर्ण जगाला महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे. याचदरम्यान रशियाने युक्रेनची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

420 सैनिक मारले!

मायकोलायव्हवर रशियन विमानाने केलेल्या उच्च शक्तीच्या शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यात सुमारे 420 सैनिक ठार झाले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी प्रसारमाध्यमांपुढे हा दावा केला. युक्रेनचे सर्व दिशांनी मोठे नुकसान झाले आहे. उच्च क्षमतेच्या हवाई क्षेपणास्त्रांनी मायकोलायव्ह शिपयार्ड क्षेत्रावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे 350 सैन्य कर्मचारी ठार झाले, तर 20 लष्करी उपकरणे नष्ट केली, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. (Russian attack on three Ukrainian fighter jets)

हे सुद्धा वाचा