Gondia Four Missing : गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, चौघांचा शोध सुरु

गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गौतम नगर येथील चौथा नाला येथे चार जण आंघोळीला गेले असताना बेपत्ता झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून चौघांचे शोध कार्य सुरू आहे. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

Gondia Four Missing : गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, चौघांचा शोध सुरु
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 12:42 AM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसा (Rain)ने थैमान घातले असून जिल्हातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक पूल वाहून गेले आहेत. याच दरम्यान अंघोळीसाठी गेलेली चार मुले पुरा (Flood)च्या पाण्यात वाहून गेल्याची घटना गोंदिया शहरातील गौतम नगर येथे घडली आहे. जावेद अली हजरत अली सय्यद (24) आणि बाबा उर्फ रेहान कलीम शेख (15) यांच्यासह अन्य दोन मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली. पुराच्या पाण्यात बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान हे चौघे बेपत्ता (Missing) झाले आहेत. अद्याप मुलांचा शोध लागला नसून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून शोध कार्य सुरु आहे.

पोहायला गेले असता वाहून गेले

गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गौतम नगर येथील चौथा नाला येथे चार जण आंघोळीला गेले असताना बेपत्ता झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून चौघांचे शोध कार्य सुरू आहे. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. अशा ठिकाणी पोहायला, अंघोळीला जाऊ नये, अशा ठिकाणी सेल्फी घेण्याचा नाद सोडून द्यावा, तसेच वाहत्या पाण्यातून वाहने काढू नये असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

नांदेडमध्ये आसना नदीच्या पुरात एक जण वाहून गेला

नांदेडमध्ये आज सांयकाळच्या सुमारास एक जण पुरातून जाण्याचा प्रयत्न करताना वाहून गेला आहे. पासदगाव इथल्या आसना नदीच्या पुरातून नांदेडकडे एक जण येत होता. यावेळी तो पुरात वाहून गेलाय, कासारखेडा गावातील रहिवाशी असलेला विलास हिंगोलेच्या शोधासाठी एसडीआरएफचे एक पथक घटनास्थळी बोटीसह दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्याला पुरात जाऊ नको असे लोकांनी बजावले होते मात्र त्याने ऐकले नाही. (Four people were swept away by the flow of water in Gondia)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....