Saksham Tate Murder : त्या लोकांनी सक्षम याला काटेरी… वाढदिवसाच्या दिवशी काय घडलं ? सक्षमच्या आईचा मोठा खुलासा

सक्षम याच्या वाढदिवशी आचलच्या भावांनी जे गिफ्ट दिल, त्यावरूनच त्याचे इरादे स्पष्ट झाले होते. त्यांनी सक्षमचा काटा काढायचं ठरवलं होतं, मृत सक्षम ताटे याच्या आईचा मोठा खुलासा. काय म्हणाल्या त्या..?

Saksham Tate Murder : त्या लोकांनी सक्षम याला काटेरी... वाढदिवसाच्या दिवशी काय घडलं ? सक्षमच्या आईचा मोठा खुलासा
सक्षम ताटे याच्या आईने केला मोठा खुलासा
Updated on: Dec 03, 2025 | 9:36 AM

अख्ख्या राज्याला हादरवणारी घटना काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये घडले. आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे सक्षम ताटे (Saksham Tate) या तरूणाची भरदिवसा हत्या करण्यात आली. त्याची प्रेयसी आचल मामीलवाड हिचे वडील आणि दोन भावांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतरही तो जिवंत होता हे पाहून त्याच्या डोक्यात दगड घालून अखेर जीव घेतला. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यांच्यामळे सक्षमचा मृत्यू झाला, त्यातला एक तरूण हा एकेकाळी त्याचा मित्रच होता. त्याच मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडल्याची शिक्षा सक्षमला भोगावी लागली अणि त्याने हकनाक जीव गमावला. मात्र त्यानंतरही प्रेयसी आचल हिने त्याची साथ सोडली नाही. उलट तिने सर्वांसमोरच सक्षम याच्या मृतदेहाशी लग्न केलं, त्याच्या नावाचम कुंकूही लावलं. हा सर्व प्रकार पाहून उपस्थित नागरिकही हेलावले.

गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये झालेल्या या हत्याकांडाने अख्खं राज्य हादरलं असून, या घटनेप्रकरणी रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यानंतर आचल ही त्याच्या घरच्यांसोबतच रहात असून, सक्षमच्या आईनेही तिचा स्वीकार केला. तिला मी मुलगी मानणार नाही, ती माझा मुलगाचआहे, सक्षमच्या जागील तिला मानेन, तिची शेवटपर्यंत साथ देईन, असा निर्धार सक्षमच्या आईने व्यक्त केला. दरम्यान याचप्रकरणात सक्षमच्या आईने एक मोठा खुलासा केला असून त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

वाढदिवसाला दिला काटेरी गुलाब

आचल हिचे वडील आणि दोन भावांनी सक्षमची हत्या केली. त्यांना सक्षम आणि आचलचे प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यांनी दोघांनाही एकमेकांपासून लांब रहायला सांगितलं होतं. एवढंच नव्हे तर सक्षम याचा काटा काढण्याचा प्लान आचलच्या कुटुंबियाच्या मनात आधीपासूनच होता. त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांचे इरादे दिसत होते, फक्त तेव्हा ते समजले नाहीत असा दावा सक्षम याच्या आईने केला.   सक्षमच्या आईने आचलचे वडील आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत.

सक्षम याच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रांनी अनेक भटवस्तू दिल्या, काहींनी फुलाचे बुकेही दिले. मात्र आचलचा भाऊ जो सक्षमचा मित्र आहे, त्या मित्राने आणि आचलच्या वडिलांनी सक्षम याला भेट म्हणून गुलाबाचं फक्त काटे असलेलं झाडं हे गिफ्ट म्हणून दिलं होतं, असं सक्षमच्या आईने सांगितलं. हे झाड जोपर्यंत हिरवं राहील तोपर्यंत आपलं प्रेम राहील, असे आचलचे कुटुंबीय तेव्हा सक्षमला म्हणाले, असा दावाही त्यांनी केला. सक्षम आपला चांगला, जीवलग मित्र आहे, असं आचलचे भाऊ दाखवायचे, पण त्यांच्या मनात दुसरच काहीतरी होते. त्या काटेरी गुलाबावरूनच ते स्पष्ट झालं, मात्र तेव्हा आम्हाला त्या भेटीमागचा अर्थ समजला नाही, असं सक्षमची आई म्हणाली. त्यांनीच सक्षमचा काटा काढला .

माझ्या सक्षमला ज्यांनी मारलं, ज्यांनी त्याचा जीव घेतला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्याच्या आईने केली आहे. माझ्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या अशीच मागणी आचलची असून सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केल्यावर ती सध्या त्याच्याच कुटुंबियांसोबत रहात आहे. त्याने मला खूप जीव लावला, मी त्याची साथ कशी सोडू असे म्हणते तिने त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.