Saksham Tate Murder Case : त्याने खूप जीव लावला, मी त्याची साथ कशी सोडू ? सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आचलचा सवाल
मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला, सगळे म्हणायचे त्या मुलीचा नाद सोड . पण त्याने मला खूप जीव लावला , मग मी त्याची साथ कशी सोडू . आताही त्याची साथ सोडणार नाही . lतो नाही, पण त्याच्या घरच्यांची साथ मी कधी सोडणार नाही, साश्रूनयांनी आंचलने तिचा निर्धार व्यक्त केला.

नांदेडमध्ये अवघ्या 19-20 वर्षांच्या झालेल्या तरूणाच्या मृत्यूचं प्रकरण प्रचंड गाजत आहे. सक्षम ताटे(Saksham Tate) या तरूणाचं आचल मामीलवाड हिच्यावर प्रेम होतं, मात्र याच प्रेमामुळे त्याचा जीव गेला. आचलच्या घरच्यांना दोघांचं नातं मान्य नव्हत आणि त्यामुळे तिचे वडील आणि दोन भावांनी मिळून सक्षमवर गोळ्या झाडल्या, त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. विजातीय प्रेमामुळे तरूणाच्या आयुष्याचा दुर्दैवी सेवट झाला. मात्र त्यानंतरही प्रेमाचा शेवट झाला नाही, कारण आचल या तरूणीने मृत्यूनतंरही तिचं प्रेम राखलं. सक्षमचा मृत्यू झाल्यावरही तिने सर्वांसमोरच त्याच्या मृतदेहाला हळद लावली, त्याच्या नावाचं कुंकू स्वत:ला लावून घेतलं आणि सर्वांसमक्ष त्याच्याशीच लग्न केलं. सक्षमला मी सगळं सांगितलं,पळून जाऊ म्हणाले .पण तो बोलला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो , त्यांना मनवून तुला न्यायचं असं त्याने सांगितलं.
त्याने मला खूप जीव लावला , मग मी त्याची साथ कशी सोडू ? आताही त्याची साथ सोडणार नाही असं म्हणत आचलने लग्नाचा निर्णय का घेतला ते रडत रडत सांगितलं. या दुर्दैवी हत्येमुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच आचलचं सक्षमवरील प्रेम पाहून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आईने तर आचलला आपलसं केलं असून मी तिला मुलगी मानत नाही, माझा मुलगाच मानते. तिला माझा सक्षम मानणार,आयुष्यभर तिची साथ देणार असा निर्धार व्यक्त केला.
का होता सक्षमबद्दल राग ?
वडिलांनी आणि भावाने सक्षमची हत्या केली याचा संपूर्ण घटनाक्रम आचल हिने सांगितला. सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते. तो आमच्या घरी नेहमी यायचा त्यातून तीन वर्षांपूर्वी आमचे प्रेम संबंध जुळले. वर्षभरापूर्वी माझ्या कुटुंबीयांना प्रेम प्रकरणाची माहिती झाली . तेव्हा वडील आणि भावांनी दबाव टाकला , धमक्या दिल्या सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर , तक्रार दे असा दबाव ते टाकत होते. तू गुन्हा दाखल केला नाहीस तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा आम्ही स्वतः जीव देऊ अशा धमक्या देत होते, शस्त्रांचा धाक दाखवत होते. म्हणून वर्षभरापूर्वी अल्पवयीन असताना मीसक्षम विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती अशी कबुली आंचलने दिली.
त्याने साथ सोडली नाही, मी कशी सोडू ?
मात्र 18 वर्ष पूर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षम च्या बाजूने साक्ष दिली असं आंचलने सांगितलं.आणि त्याच गुन्ह्यात सक्षम वर एमपीडीएची कारवाई झाली, तो गुन्हेगार नव्हता असंही ती म्हणाली . मी त्याला सांगितलं,आपण पळून जाऊ. पण तो म्हणाला की मी तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो, त्यांना नवून ग तुला नेणार. माझ्या प्रेमाच माहीत नाही, पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा,असं तिने सांगितलं.
मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला, सगळे म्हणायचे त्या मुलीचा नाद सोड . पण त्याने मला खूप जीव लावला , मग मी त्याची साथ कशी सोडू . आताही त्याची साथ सोडणार नाही . तो तर या जगात नाही पण तरी त्याची साथ सोडणार नाही . मी त्याच्यासोबत आहे , त्याच्या परिवारासोबत आहे. माझ्यामुळे , माझ्या प्रेमामुळे त्यांचा मुलगा गेला आता मी त्यांची साथ नाही सोडू शकत असं म्हणत आचलने लग्नाचा आणि त्याच्या घरच्यांसोबतच रहायचा निर्णय का घेतला ते सांगितलं.
