Saksham Tate Murder case : आंचल माझी मुलगी नाही, ती.. सक्षम याच्या मृत्यूनंतर आईचा मोठा निर्णय
नांदेडमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारं हत्याकांड घडलं. प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी एका तरूणाची हत्या केली. मात्र प्रियकर सक्षम याच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी आंचल हिने त्याच्या मृतदेहाशीच लग्न केलं. तिने त्याच्या घरच्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र मृत सक्षम याच्या आईने...

नांदेडमध्ये प्रेमप्रकरणाचा झालेला भयानक शेवट सगळ्यांनाच हादरवणारा आहे. आंचल मामीडवार आणि सक्षम ताटे या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं, अखेर आंचलचे पिता आणि दोन भाऊ यांनी मिळून सक्षचमी गोळया झाडून हत्या केली. त्याच्या डोक्यातही दगड घातला. यामध्ये 19 वर्षांच्या सक्षमचा बळी गेला. सक्षमचा मृतदेह पाहून आंचलने हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. मात्र मृत्यूनतंरही तिने त्याची साथ सोडली नाही. आंचलने सर्वांसमोरच सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं आणि त्याची पत्नी बनली. माझ्या सक्षमला मारणाऱ्यांना फाशी द्या म्हणत ती अश्रू ढाळू लागली.
नांदेडमध्ये 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने सर्वच हादरले असून सक्षमच्या कुटुंबियांचा, आंचलचा आक्रोश पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईलच. मात्र या सर्वांदरम्यानच सक्षमच्या आईने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंचनने सक्षमशी लग्न केल्यावरही सक्षमच्या आईने तिला मुलगी मानण्यास नकार दिला. उलट ती मला मुलाच्या जागी आहे, तिला मी माझा सक्षम मानेन असं म्हणत तिने शोकाकुल आंचलला आपलंस केलं. तर दुसरीकडे आंचल हिने तिचे वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसांत साक्ष दिली असून सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशीच मागणी केली आहे.
मी तिला मुलगी मानणार नाही – सक्षमच्या आईची प्रतिक्रिया
आंतरजातीय प्रेमामुळे सक्षम ताटेला जीव गमवावा लागला. अवघ्या 19 वर्षांचा मुलगा गवाल्यामुळे ताटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या घरच्यांची, आईची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. मात्र त्यातही सक्षमच्या आईने घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळेच अवाक् झाले. सक्षमच्या मृतदेहाला हळद लावून, त्याच्या नावाचं कुंकू लावून आंचलने त्याच्याशी लग्न केलं, त्याच्या कुटुंबियांसोबतच राहण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. त्यानंतर सक्षमच्या आईनेही तिला मायेची हाक मारली.
‘ जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते ना तसंच मी तिच्यावर प्रेम करेन. आत्ताच्या काळात मुलगा आणि मुलगी समान आहेत. मी तिला ( आंचल) मुलगी मानणार नाही, तिला मी सक्षम मानेन, तिला मी मुलाचाच अधिकार देईन’ अशा शब्दांत मृत सक्षम ताटेच्या आईने भावना व्यक्त केल्या. मीतिच्यामध्येच सक्षमला पाहीन. असंही मला मलगी नाहीये, त्यामुळे मी तिला स्वत:ची मुलगी मानून तिच्यावर प्रेम करेन, जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मीप्रेम करेन, मी आयुष्यभर आंचलची साथ सोडणार नाही, असा शब्दंही सक्षमच्या आईने सर्वांसमोर दिला. माझ्या लेकाला ज्यांनी मारलीं त्या लोकांना फाशीची सजा मिळालीच पाहिजे, अशी मागणीही सक्षमच्या आईने केली आहे.
