ब्रॅडेंड कंपनीचं लेबल लावून तेल विक्री, मुंबईत गोडावूनवरती छापा मारल्यानंतर…

Mumbai News : डोंबिवलीत नामांकित कंपनीचे लेबल लावून भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुंबईतल्या एका गोडावूनवरती छापा टाकला आहे. त्यामध्ये त्यांना लाखो रुपयांचा माल सापडला आहे.

ब्रॅडेंड कंपनीचं लेबल लावून तेल विक्री, मुंबईत गोडावूनवरती छापा मारल्यानंतर...
Mumbai News
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2023 | 9:31 AM

डोंबिवली : जनसामान्यांच्या रोजच्या वापरातील आणि जीवनाशयक वस्तू म्हणून खाद्यतेलाकडे बघितले जाते. त्याचं तेलात आता खालच्या दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर (DUPLICATE LEBAL) लावून मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या तीन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंबईतल्या मस्जिद बंदर (Masjid Bandar) या परिसरात या परिसरात ही कारवाई झाली आहे. कालच्या कारवाईमुळे अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी होणार असून मुंबईत आणखी किती ठिकाणी असे प्रकार सुरु आहेत याची सुध्दा माहिती उघडकीस येईल अशी पोलिसांनी (POLICE) माहिती दिली आहे.

डोंबिवलीत काही दिवसापूर्वी दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता खालच्या दर्जाच्या खाद्यतेलाला नामांकित कंपनीचे स्टिकर लावून सपूर्ण महाराष्ट्रत विक्री होत होती. तसेच याच खाद्यतेलाची विक्री मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत होत होती. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी डोंबिवली पूर्व येथील एका तेलाच्या व्यापारीला ताब्यात घेतले होते. यावेळी व्यापाऱ्याने मुंबईतील एका डीलरकडून तेल घेतल्याची माहिती रामनगर पोलिसांना दिली होती.

भेसळयुक्त तेल नेमकं बनत कुठे तयार केलं जातं, यासाठी रामनगर पोलिसांनी विविध टीम बनवत शोध सुरू केला होता. याच प्रकरणात रामनगर पोलिसांना सुत्रांकडून मुंबईच्या मस्जिद बंदर येथे एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त तेलाला नामांकित कंपनीचे लेबल लावत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हवालदार विशाल वाघ, निलेश पाटील जयपाल मोरे, नितीन सांगळे यांनी मस्जित बंदर येथील गोडावूनवर छापा मारत ५ लाख ४५ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपीना ताब्यात घेतले. दीपक जैन, तारिक मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते असे या आरोपीची नावे असून या आरोपींनी अजून किती ठिकाणी अश्या प्रकारे गोडावून उघडले आहे, याचा तपास रामनगर पोलीस करत आहे.