AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेच्या ग्राहकांची 10 लाखांची फसवणूक, सेल्स ऑफिसरला ठोकल्या बेड्या

अॅक्सिस बँकेतील 10 ग्राहकांची एकूण 90 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सेल्स मॅनेजरला मिरज पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

बँकेच्या ग्राहकांची 10 लाखांची फसवणूक, सेल्स ऑफिसरला ठोकल्या बेड्या
सांगलीत बँक ग्राहकांची फसवणूक करणारा मॅनेजर अटकेतImage Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2023 | 6:55 PM
Share

सांगली / शंकर देवकुळे : मिरजेत अॅक्सिस बँकेच्या दहा ग्राहकांची 90 लाखाला फसवणूक करून फरार झालेल्या सेल्स ऑफिसरला पोलिसांनी अटक केली आहे. तोहीद शरिक मसलत असे फसवणूक करणाऱ्या सेल्स ऑफिसरचे नाव आहे. या फसवणूक प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मिरज पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरु केला. अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. आरोपीला अटक करत पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

ग्राहकांना 90 लाखांचा घातला गंडा

मिरजेतील ॲक्सिस बँकेत तोहीद शरीक मसलत याची सेल्स ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सेल्स ऑफिसरने तीन वर्षात बँकेतील ग्राहकांचा विश्वास संपादन करून 90 लाखाचा गंडा घालून फरार झाला होता. जेव्हा बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यावरील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच बँक ग्राहकांनी ॲक्सिस बँकेत तसेच मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मिरज पोलिसांकडून आरोपीला अटक

फसवणूक झालेल्या ग्राहकांनी मिरज पोलीस ठाण्यात तोहीद विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 10 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी तोहिद विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरु केला. अखेर आरोपीला पकडण्यास मिरज पोलिसांना यश आले आहे.

बार्शीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी

शहरातील शिवाजीनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँक फोडून बँकेचे महत्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप जाळण्याचा प्रयत्न केला. या चोरीत बँकेचे दागदागिने असणारे लॉकर चोरटे तोडू शकले नाही. मात्र बँकेचे महत्त्वाचे दस्तऐवज, लॅपटॉप अज्ञात चोरट्याकडून जाळण्यात आले. यावेळी चोरटे बँकेतील दहा हजार रुपयांची चिल्लर घेऊन पसार झाले. दरम्यान याविरोधात बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.