AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलतेमालते, सगळेच भिडले, मुलाच्या वडिलांना विद्यूत खांबाला बांधून मरेस्तोवर मारहाण, अख्खं गाव पाहत राहिलं…

मुलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या आई-वडिलांना भोगावी लागल्याचा, एका धक्कादायक प्रकार सांगलीतील शिराळा तालुक्यात घडला आहे. तेथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला

चुलतेमालते, सगळेच  भिडले, मुलाच्या वडिलांना विद्यूत खांबाला बांधून मरेस्तोवर मारहाण, अख्खं गाव पाहत राहिलं...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jan 18, 2024 | 1:19 PM
Share

सांगली | 18 जानेवारी 2024 : त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं… मला सांगा तुमचं काय गेलं ? विख्यात कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता बहुतांश लोकांना माहीत असेल. इतरांच्या प्रेमात तुमचं नाक खुपसू नका, असा साधा सरळ सल्ला देण्यासाठी पाडगावकरांनी ही कविता लिहीली. समाजाला आरसा दाखवण्यासाठी. पण आजच्या युगात ही कविता कितपत लागू होईल, माहीत नाही. पण सांगलीतील एका घटनेबद्दल ऐकून तुमचं काळीज हलेल हे नक्की.

मुलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या आई-वडिलांना भोगावी लागल्याचा, एका धक्कादायक प्रकार सांगलीतील शिराळा तालुक्यात घडला आहे. तेथे प्रेमप्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या जबर मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी बारा जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली.

नेमकं काय घडलं ?

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलीचे आई वडील,चुलत चुलते आणि नातेवाईकांनी मुलाच्या पालकांना मारहाण केली. आधी त्यांना दोरीने वीजेच्या खांबाला बांधण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या वडीलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. दादासाहेब रामचंद्र चौगुले असे मयताचे नाव आहे. या घटनेने शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात सात जण अटकेत आहेत. यामध्ये मुलीचे आई-वडील, चुलता-चुलती, दाजी यांचा समावेश आहे.

वीजेच्या खांबाला बांधलं आणि.. 

मयत दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेलाय, ते कुठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना वीजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच