AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मिळाले महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांना मिळाले महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज
| Updated on: Feb 11, 2025 | 8:25 AM
Share

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आरोपींना मिळाले आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे होणार आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजीचे हे सीसीटीव्ही फुटेच आहेत.

संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा ९ डिसेंबर २०२४ चा संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती सीआयडीकडून घेतली. त्यानंतर ते म्हणाले, मोबाईलचा डाटा रिकव्हर झाला आहे. तो डाटा सीआडीकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईल बाबत तपास सुरु आहे. तो डाटासुद्धा रिकव्हर झाला आहे. तसेच सर्व आरोपींवर खुनाचे गुन्हे आणि मकोका लावण्यात आले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक झाली आहे. आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

बीड पोलीस आक्रमक, 310 शस्त्र परवाने रद्द

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई केली. पहिल्या टप्प्यात 100, दुसऱ्या टप्प्यात 60, तिसऱ्या टप्यात 23 तर चौथ्या टप्प्यात 127 परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी हा दणका दिला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.