AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche Accident : ‘माझ्या मनाला ते पटत नव्हत, पण…’, डॉ. श्रीहरी हळनोरने सांगितलं पडद्यामागच सत्य

Pune Porsche Accident : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. हिट अँड रनच्या या प्रकरणात पैशांचा वापर करुन कायद्याला वाकवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी ससूनमधील डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.

Pune Porsche Accident : 'माझ्या मनाला ते पटत नव्हत, पण...', डॉ. श्रीहरी हळनोरने सांगितलं पडद्यामागच सत्य
Dr Ajay Taware-Dr Shrihari Halnor
| Updated on: May 30, 2024 | 10:55 AM
Share

पुणे हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून टोकाचे प्रयत्न झाले. अनेक नियमबाह्य गोष्टी करण्यात आल्या. पैशाच्या जोरावर कायद्याला धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला. पण मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यामुळे सुदैवाने या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. अल्पवयीन आरोपीच चक्क ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं. जेणेकरुन, अपघाताच्यावेळी तो दारु पिऊन गाडी चालवत होता, हे सिद्ध होणार नाही. पुण्यातील ससून रुग्णालयात रक्ताचे हे नमुने बदलण्यात आले. या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आहे. ससूनमधील या ब्लड फेरफार प्रकरणात पोलिसांनी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे या तिघांना अटक केली आहे.

आता अटकेत असलेल्या डॉ श्रीहरी हळनोरने मोठी कबुली दिली आहे. त्यामुळे डॉ. अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. डॉ. श्रीहरी हळनोरवर डॉ. अजय तावरेने दबाव टाकला. डॉ. तावरे व विशाल अग्रवाल यांचं बोलणं झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी डॉ. तावरे यांनी माझ्यावर दबाव टाकला अशी हळनोरने कबुली दिली आहे. रक्त बदलण, माझ्या मनाला ते पटत नव्हत. माझ्याकडून मोठी चूक झाल्याच मला वाटत होतं अशी हळनोरने कबुली दिली आहे. डॉ. श्रीहरी हळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.

बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलले का?

पुण्याच्या ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच रक्त बदलण्यात आलं. त्यावेळी मूळ रक्त सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देण्यात आलं. पुणे पोलिसांनीच ही माहिती दिली. रक्ताचे नमुने घेण्यासाठी चक्क ससून रुग्णालयात काही खाजगी लोकांनी प्रवेश केल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयातील नव्हे, तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलल्याच बोलल जातय. ससूनमध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडले. कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.