जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी साताऱ्यात तरुणाची हत्या, चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन उलगडा

| Updated on: Aug 03, 2021 | 9:28 AM

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील गोळेश्वर या ठिकाणी नदीकडे असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये पाचोळ्यात 13 जुलै 2021 रोजी सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता

जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी साताऱ्यात तरुणाची हत्या, चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन उलगडा
कराडमधील हत्येप्रकरणी झारखंडमध्ये कारवाई
Follow us on

कराड : जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी हत्या करुन पसार झालेल्या आरोपीला कराड पोलिसांनी दमदार कामगिरी करत पकडले. आरोपीला झारखंडमधून ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. साताऱ्यात ऊसाच्या शेतामध्ये गेल्या महिन्यात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला होता. चांदीच्या तुटलेल्या चेनवरुन कराड पोलिसांनी हत्या प्रकरणाचा उलगडा केला.

नेमकं काय घडलं?

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील गोळेश्वर या ठिकाणी नदीकडे असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये पाचोळ्यात 13 जुलै 2021 रोजी सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली होती. तपासात इस्माईल शताबुद्धीन शेख (वय 25 वर्ष, मूळ रा. बालुग्राम ता. राधानगरी जि. साहबगंज, झारखंड) या पुरुषाचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

कराड येथील हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपींना शोधून काढले असून जुगारात हरलेले पैसे मिळवण्यासाठी खून झाल्याचे समोर आल्याची माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. आरोपी मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख (वय 23, रा. इर्शादटोला, ता. राजमहल जि. साहेबगंज, राज्य झारखंड) याला कराड पोलिसांनी 1 ऑगस्ट 2021 रोजी रात्री अटक केली.

 जुगारात हरलेल्या पैशावरुन राग

खुनातील आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तरीही कराड पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. तसेच गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत त्याला झारखंड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जुगारात हरलेल्या पैशाचा राग मनात धरून इस्माईल शेख याला चाकूने वार करुन जीवे ठार केले होते. तसेच त्याच्या जवळील 9 हजार 500 रुपये काढून घेतल्याची कबुली आरोपीने दिली.

तुटलेल्या चांदीच्या चेनवरुन खुनाचा उलगडा

घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंमध्ये एक चांदीची तुटलेली चेन होती. ही चेन यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, पोलीस नाईक एम. एम. खान, संदीप पाटील या पथकाने धागेदोरे लावून मृताच्या गावी झारखंडला जाऊन काही जणांना कराडला बोलवले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यातील मोहंमद सेटु आलम हिजाबुल शेख याने कबुली दिली.

संबंधित बातम्या :

कॅटरर्स चालकाची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं

वकील रस्त्याने जात असताना अचानक दुचाकीवरुन दोन जण आले, मोबाईल हिसकावला आणि….

(Satara Karad Youth Murder over lost money in Gambling)