AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SATARA : दोन मालवाहू ट्रकची धडक, चालक आणि सोबत असणाऱ्याचे पाय अडकले, शेवटी…

सकाळी साडेसहा वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली

SATARA : दोन मालवाहू ट्रकची धडक, चालक आणि सोबत असणाऱ्याचे पाय अडकले, शेवटी...
truck accidentImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 05, 2023 | 9:32 AM
Share

सातारा : साताऱ्यात (SATARA) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकमध्ये (truck accident) अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही ट्रक माल वाहतुक असल्यामुळे अपघातानंतर ट्रकमधील लोकांना बाहेर काढताना अग्नीशामन दलाची दमछाक झाली. हा अपघात सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर झाला आहे. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना (satara police) या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडचण येत असल्यामुळे पोलिसांनी अग्नीशमक दलाल तिथं पाचारण केलं.

अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

सकाळी साडेसहा वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली, तसेच त्यामधे दोन व्यक्ती जखमी अवस्थेत अडकल्या आहेत. त्याचवेळी तातडीने पाषाण अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाल्या.

जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी अपघाताची पाहणी केली. रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी अवस्थेत होते. त्याचवेळी दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे, वय ६० आणि सुरज सुर्वे, वय ३० अशी त्यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याचे समजते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.