अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, मग स्कूलबस‌ चालकाकडून घृणास्पद कृत्य

अल्पवयीन मुलीला घरच्यांविरोधात भडकावून फूस लावली. मग पळवून नेत घृणास्पद कृत्य केले. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, मग स्कूलबस‌ चालकाकडून घृणास्पद कृत्य
नगरमध्ये स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2023 | 5:56 PM

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, मुलीच्या स्कूलबस चालकानेच हे घृणास्पद कृत्य केले. विजय गोविंद गोडसे असे आरोपीचे नाव आहे. मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला पोलीसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फूस लावून मुलीला घरुन घेऊन गेला

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझे आई-वडील तुला त्रास देतात ते पाहवत नाही, आपण त्यांच्यापासून लांब निघून जाऊ, असे बोलत मुलीला फूस लावून आरोपी घरातून घेऊन गेला. त्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचारही केला. मुलगी बेपत्ता होताच मुलीच्या आई-वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध सुरु केला.

सापळा रचून आरोपीला अटक

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ट्रॅक करत, सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आरोपीचा ठावठिकाणा शोधत होते. आरोपीला याची खबर लागताच त्याने मुलीला दुसऱ्या दिवशी राहुरी फॅक्टरी येथे सोडून दिले. मुलगी सापडताच मुलीची चौकशी केली असता तिने सर्व प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. आरोपी 16 जून रोजी रात्री राहुरी फॅक्टरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीला अटक केली.