AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad mohol murder | आरोपींकडून आधीही हत्येचा प्रयत्न, शरद मोहोळला एकटं पाडून..

Sharad mohol murder case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या झाली. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत दोन वकिलांसह आठ जणांना अटक. हत्याप्रकरणी नवी माहिती समोर

Sharad mohol murder | आरोपींकडून आधीही हत्येचा प्रयत्न, शरद मोहोळला एकटं पाडून..
| Updated on: Jan 11, 2024 | 10:03 AM
Share

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 11 जानेवारी 2024 : संपूर्ण पुण शहराला हादरवणारी घटना शुक्रवारी घडली. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून त्यामध्ये रोज नवनवी माहिती समोर येत आहे. धक्कादायक खुलासेही होत आहेत. याप्रकरणात आठ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या हत्याप्रकरणी आणखी माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याच्या खुनातील आरोपींना आणखीन सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तसेच पोलीस तपासामध्ये आरोपींकडे आणखीन तीन काढतुसे सापडल्याचेही समोर आले आहे.

शरद मोहोळ याच्या हत्येचा आधीही प्रयत्न, दोनदा एकटं पाडून..

शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी शरद मोहोळ याची त्याच्या घराजवळच हत्या करण्यात आली. एका अरुंद गल्लीत, दोन ते तीन जणांनी शरद मोहळावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. त्याला उपाचारांसाठी सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले. तेथून ससूनलाही हलवले, पण काही उपयोग झाला नाही. शरद मोहोळ याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत ८ आरोपींना अटक केली. तसेच या प्रकरणात पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय मटकर आणि सतीश शेंडगे यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

आता या हत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. शुक्रवारी शरद मोहोळची हत्या झाली. मात्र तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहो याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा तो फसला. अखेर शुक्रवारी, मोहळ याच्या लग्नाच्या वाढदिवशीच, आरोपींनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असून या गुन्ह्यातील मास्टर माईंड कोण आहे याचा शोधही पोलिस घेत आहेत.

महिन्याभरापूर्वीच शिजला हत्येचा कट

शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात खळबळ माजली, या हत्याकांडाने अनेकांना धक्का बसला. पण मिळालेल्या माहितीनुसार, हे काहीही अचानक घडलेलं नाही. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसं हा कट रचत होते आणि याचा शरद मोहोळला जरासुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळ याचा खून करणारी त्याच्याच जवळची होती हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले.

तेव्हापासून आरोपी धुमसत होते

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार घडत होती. त्याचाच राग आरोपींच्या मनात धुमसत होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच हत्येचा हा कट रचला. शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी घरात जेवल्यानंतर आरोपींनी त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.