Video : Sharad Mohol | विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ जुन हाडवैर समोर, टीव्ही9 मराठीचा पाहा स्पेशल रिपोर्ट
शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी याप्रकरणात दुसरा एक गुंड विठ्ठल शेलारला अटक केली आणि धक्कादायक म्हणजे ज्या शरद मोहोळला भाजप नेत्यांनी देशभक्त ठरवलं. भाजपचा पदाधिकारी असलेल्या विठ्ठल शेलारला अटक झालीय. विठ्ठल शेलार याने का संपवलं? टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट पाहा

पुणे : पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात शेलार टोळीचा म्होरक्या विठ्ठल शेलारला पोलीस कोठडी मिळालीय. कोण आहे विठ्ठल शेलार आणि पुणे पोलिसांनी या हत्याबाबतीत काय तपास केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून दहशतवाद्यांनी केला का, अशी शंका काल हिंदुत्ववादी संघटनांनी वर्तवली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी याप्रकरणात दुसरा एक गुंड विठ्ठल शेलारला अटक केली आणि धक्कादायक म्हणजे ज्या शरद मोहोळला भाजप नेत्यांनी देशभक्त ठरवलं, त्याच मोहोळच्या हत्याप्रकरणात गुंड आणि भाजपचा पदाधिकारी विठ्ठल शेलारला अटक झालीय.
विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोन्ही आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली गेलीय. मोहोळच्या हत्येमागे याच दोघांचा हात असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. काही दिवसांपूर्वीच्या एका बैठकीत हत्येचा कट रचला होता, असंही पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.
विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यांमध्ये आधीपासून हाडवैर होतं. आता हा विठ्ठल शेलार कोण आहे., शरद मोहोळची पार्श्वभूमी काय ? विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातल्या उरवडे गावचा राहणारा आहे. शेलार टोळीचा तो म्होरक्या असून त्याच्यावर खुन, खंडणी, अपहरण, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे आहेत. 2014 मध्ये मोक्काअंतर्गत त्याला अटक झाली होती. 2017 च्या जानेवारी महिन्यात विठ्ठल शेलार जामिनावर तुरुंगातून बाहेर आला नंतर 2018 मध्ये गुंड शेलारला भाजपनं प्रवेश दिला. मुळशी-भोर-वेल्हा या 3 तालुक्यात भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षपद दिलं गेलं. यावरुन तेव्हा भाजपात गुंडांना प्रवेश दिला जातो, म्हणून टीकाही झाली
आता ज्याचा खून झाला., तो गुंड शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या होता. अपहरण, खुनाचे प्रयत्न, आणि हत्येचा आरोपही शरद मोहोळवर होते. अनेक खटल्यात त्याला जेल झाली. 2021 साली शहद मोहोळ जामीनावर तुरुंगाबाहेर आला. नंतर 2023 साली शरद मोहोळच्या पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केला होता.
वर्षभरापूर्वी शरद मोहोळच्या टोळीनं विठ्ठल शेलारवर हल्ला केला होता. हिंजवडीत गाडी अडवून मारहाणीचा प्रयत्न झाला होता., मात्र विठ्ठल शेलारला तिथून निसटण्यात यश आलं. विरोधानंतर भाजपनं गुंड विठ्ठल शेलार आणि मोहोळच्या पत्नीला भाजपमध्ये प्रवेश दिला. मात्र दोघांमधल्या व्यावसायिक वाद काही थांबला नाही. आता त्याच वादातून शेलार टोळीनं हत्या केल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलीय.
आश्चर्य म्हणजे एकीकडे गृहमंत्री फडणवीस शरद मोहोळ गुंड म्हणतात. दुसरीकडे भाजपचेच नेते मोहोळला देशभक्त म्हणतात. काही हिंदुत्ववादी संघटना मोहोळच्या हत्येमागे दहशतवादी असल्याचा दावा करतात आणि चौथ्या दिवशी मोहोळच्या हत्येप्रकरणी भाजपचाच पदाधिकारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विठ्ठल शेलारला मोहोळच्या हत्येत अटक होते.
