AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी मध्यरात्रीच पोलीस घुसले… शरद मोहोळ प्रकरणात मोठी कारवाई; काय काय घडलं रात्रभरात?

Sharad Mohol Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मुळशीचा डॉन विठ्ठल शेलार याला पोलिसांनी अटक केली आहे. क्राईम ब्रांचने रात्री टाकलेल्या छाप्यात बड्या बड्या गुंडांना अटक केली. काय काय घडलं रात्रभरात? जाणून घ्या.

रविवारी मध्यरात्रीच पोलीस घुसले... शरद मोहोळ प्रकरणात मोठी कारवाई; काय काय घडलं रात्रभरात?
| Updated on: Jan 16, 2024 | 3:29 PM
Share

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरने आणि त्याच्या दोन साथीदारांनी गोळ्या घातल्या होत्या. या हत्येमागचा खरा मास्टरमाईंड आधी मुन्नाचा मामा नितीन कानगुडे असल्याचं समोर आलं होतं. मात्र मुळशी तालुक्यामधीलच गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे हे मुख्य मास्टरमाईंड असण्याची आता दाट शक्यता आहे. पोलिसांनी वाशीमध्ये एका फार्महाऊसवर मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी मुळशीमधील गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना ताब्यात घेतलं.

काय काय घडलं रात्रभरात?

शरद मोहोळ याच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी विठ्ठल शेलार याला चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीनंतर शेलार फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यानंतर पोलिसांना खबर लागली की तो पनवेल तो वाशीमधील दरम्यानच्या असलेल्या एका फार्म हाऊसवर आहे. क्राईम ब्रांचने पनवेल पोलिसांची मदत घेतली आणि छापा टाकला.

पोलिसांचा हा छापा यशस्वी ठरला, कारण मुळशीमधील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी नव्या 11 आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने घेतलं घेतलं आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या अटकेत येणार आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पकडला जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं.

कोण आहे विठ्ठल शेलार?

विठ्ठल शेलार हा एक मोठा गुंड असून मुळशी तालुक्यामधील बोतरवाडीचा आहे. शेलार सुरूवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता तोच गणेश मारणे ज्याने संदीप मोहोळला संपवलं होतं. गणेश मारणेसाठी त्याने खंडणीची कामं केल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं. विठ्ठल शेलार याने मुळशीमधील दोघा जणांना एका दगडी खाणीत जाळून टाकलं होतं. शेलारने गुन्हेगारी क्षेत्रात आधीच आगमन केलं होतं. पण या खूनानंतर त्याने पिंट्या मारणेला संपवत आपली गँँग प्रस्थापित केली. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शेलारकडे भाजपने युवा अध्यक्षपदी  जबाबदारी दिली होती.

दरम्यान, आता या प्रकरणामध्ये जवळपास 24 जणांना पुणे पोलिसांची ताब्यात घेतलं आहे. साहिल पोळेकर हा मोहरा फक्त होता हे जवळपास निश्चित झालं आहे. साहिल पोळेकर याने पळून जाताना मास्टरमाईंडला सांगा गेम झालाय, हे कॉल रेकॉर्डिंग महत्त्वाचा धागा ठरलं.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.