
ही आहे प्रेम, विश्वासघात आणि वेडेपणाची कहाणी, ज्याचा शेवट खुनाने झाला. हरियाणातील पानीपत येथील मॉडेल शीतलची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी आहे शीतलचा पूर्व प्रियकर सुनील. पोलिसांनी सुनीलला अटक केली असून, चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. शीतलचा मृतदेह सोनीपतच्या खरखौदा येथे सापडला. हात आणि छातीवरील टॅटूमुळे मृतदेहाची ओळख पटली.
शीतलची बहीण नेहाच्या जबाब आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली. सुनीलने स्वतः कालव्यात पडल्याची खोटी कहाणी रचली होती. शीतल सुनीलशी बोलत नव्हती, कारण तिला सुनील विवाहित असल्याचे समजले होते. यामुळेच शीतलने त्याच्याशी संबंध तोडले आणि विशाल नावाच्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने विशालच्या नावाचा हातावर टॅटू काढला होता, ज्याचा सुनीलला राग येत होता.
वाचा: नवरा येताच छतावरून उडी मारून पळाली… हॉटेलमध्ये असं काय घडलं? सीसीटीव्हीत असं काय झालं कैद?
पतीपासून घटस्फोट झाला होता
शीतलचे कुटुंब मूळचे बिहारचे होते. पण तिचा जन्म आणि संगोपन पानीपत येथे झाले. तिचे आधी लग्न झाले होते आणि तिला दोन मुलेही होती. मॉडेलिंगच्या आवडीमुळे तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ती तिच्या बहिणीसोबत राहू लागली आणि करनाल येथील एका हॉटेलमध्ये नोकरी करू लागली. तिथेच तिची भेट सुनीलशी झाली, जो त्या हॉटेलचा मालक होता.
हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. पण जेव्हा शीतलला सुनील विवाहित असल्याचे समजले तेव्हा तिने त्याच्यापासून अंतर ठेवले. यामुळे संतापलेला सुनील तिच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचत असे आणि तिच्यावर नजर ठेवत असे. १४ जूनच्या रात्री शीतल अहर गावात शूटिंगसाठी गेली होती. तिथे सुनील पोहोचला आणि तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेला. शीतलने तिच्या बहिणीला व्हिडिओ कॉल करून सांगितले की सुनील तिला जबरदस्तीने घेऊन जात आहे आणि मारहाण करत आहे. त्यानंतर तिचा संपर्क तुटला.
मृतदेह कालव्यात फेकला
सुनीलने शीतलला गाडीत बसवले. दोघे गाडीतच शहरात फिरत होते. काही कारणाने सुनील आणि शीतलमध्ये भांडण झाले. सुनीलने चाकूने शीतलचा खून केला. मृतदेह कालव्यात फेकून त्याने स्वतः गाडीही कालव्यात टाकली, जेणेकरून हा अपघात वाटेल. पण पोलिसांच्या तपासात सर्व सत्य समोर आले. १५ जूनच्या रात्री शीतल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आणि १६ जूनच्या सकाळी तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सुनीलला अटक केली असून तपास सुरू आहे.