Siddhu Moosewala Murder : माझ्या मुलाच्या हत्येमागे जवळचे मित्र आणि व्हाईट कॉलर राजकारण्याचा हात, मुसेवालाच्या वडिलांचा दावा

सिद्धूच्या हत्येसाठी काही गायक जबाबदार आहेत, ज्यांना सिद्धूने चांगले गाणे पसंत नव्हते. पण सिद्धूला मारणारे हे गायक कधीच प्रगती करणार नाहीत. सिद्धूच्या गाण्यांबद्दल एका गटाने सर्वांची दिशाभूल केली. सरकारचीही दिशाभूल झाली, असे बलकार सिंह म्हणाले.

Siddhu Moosewala Murder : माझ्या मुलाच्या हत्येमागे जवळचे मित्र आणि व्हाईट कॉलर राजकारण्याचा हात, मुसेवालाच्या वडिलांचा दावा
सिद्धू मूसेवालाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 6:20 PM

पंजाब : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala)च्या हत्येप्रकरणी त्याचे वडील बलकार सिंह यांनी मोठा दावा (Claim) केला आहे. सिद्धूच्या हत्येमागे काही गायक आणि राजकीय लोकांचा हात असल्याचे मुसेवालाच्या वडिलांनी म्हटले आहे. याबाबत लवकरच खुलासा (Disclosure) करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी मुसेवाला यांच्या घरी आई-वडिलांना भेटण्यासाठी लोक आले होते. यावेळी मुसेवालाच्या वडिलांनी त्या लोकांशी संवाद साधताना आपल्या मुलाने अल्पावधीतच अधिक प्रगती केल्याने त्याचा बळी गेल्याचे म्हटले. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावालगतच्या परिसरात 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार याच्यावर ही हत्या केल्याचा आरोप आहे.

सिद्धूच्या हत्येसाठी काही गायक जबाबदार

सिद्धूच्या हत्येसाठी काही गायक जबाबदार आहेत, ज्यांना सिद्धूने चांगले गाणे पसंत नव्हते. पण सिद्धूला मारणारे हे गायक कधीच प्रगती करणार नाहीत. सिद्धूच्या गाण्यांबद्दल एका गटाने सर्वांची दिशाभूल केली. सरकारचीही दिशाभूल झाली, असे बलकार सिंह म्हणाले. सिद्धूने एका गाण्यात म्हटले होते – “जे आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाहीत, ते मला सल्ला देतात.” पण त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.

लवकरच सर्वांची नावे उघड करणार

सिद्धूच्या वडिलांनी घरी उपस्थित लोकांना सांगितले की, त्याच्या छोट्याशा कारकिर्दीत त्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे काही लोकांची इच्छा होती की, सिद्धू जे काही करतो, ते त्यांच्या माध्यमातून करावे. पण तो शेवटपर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर राहिला आणि मी असाच जगेन. जेव्हा सिद्धू कॅनडात शिकण्यासाठी गेले होता, तेव्हा काही चुकीचे लोक त्याच्या संपर्कात येऊन फायदा घेऊ पाहत होते. सिद्धूच्या वडिलांनी सांगितले की, लवकरच ते त्यांच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्वांची नावे जनतेसमोर उघड करतील. (Sidhu Moosewas father claims that friends and politicians were the ones to kill him)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.